महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदगाव मतदारसंघात शिवसेनेचाच आमदार होणार - उद्धव ठाकरे - Nandgaon assembly constituency

शेतकऱ्यांची कर्जमाफी व पिकविमा योजनेसंदर्भात सुसंवाद साधण्यासाठी नांदगाव येथे आज शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दौरा आयोजित केला होता.

नाशिक

By

Published : Jun 22, 2019, 10:11 PM IST

नाशिक - शेतकऱ्यांची कर्जमाफी व पीकविमा योजनेसंदर्भात सुसंवाद साधण्यासाठी नांदगाव येथे आज शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दौरा आयोजित केला होता. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी नांदगाव मतदारसंघात आमदार शिवसेनेचाच असणार, असे सूचक वक्तव्य केले. तसेच पीक विमा कंपन्यांना शेतकऱ्यांना फसवाल तर तुमची दुकानदारी बंद करू, असा इशारा दिला.

उद्धव ठाकरे म्हणाले, येत्या पंधरा दिवसात पीक विमा योजनचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले नाहीत, तर विमा कंपन्यांची दुकानं बंद करणार. पीक विमा योजना काही दलालांनी खाल्ली आहे. प्रत्येक तालुक्यात एक तरी शेतकरी मदत केंद्र सुरू करणार आहे. आमचं युतीचं जमलंय आणि शिवसेना सत्तेत राहून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवते. यावेळी संजय राऊत, एकनाथ शिंदे, सुहास कांदे, सुभाष कुटे आदींनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बी-बियाणे व फवारणी पंप मोफत वाटण्यात आले. या मेळाव्यास शिवसेना पदाधिकारी व हजारोच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details