महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Two workers Killed : उत्तर प्रदेशातील दोन कामगारांचा पत्रा तुटून पडल्याने मृत्यू, नाशिकमधील इगतपुरी येथील घटना - Wadivarhe

इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे जवळ असणाऱ्या फॅब कंपनीत झालेल्या दुर्घटनेत २ कामगारांचा मृत्यू झाला. रात्री पावणेआठ वाजता झालेल्या ह्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Two workers Killed
Two workers Killed

By

Published : Mar 13, 2022, 9:36 AM IST

Updated : Mar 13, 2022, 9:48 AM IST

नाशिक - इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे जवळ असणाऱ्या फॅब कंपनीत झालेल्या दुर्घटनेत २ कामगारांचा मृत्यू झाला. रात्री पावणेआठ वाजता झालेल्या ह्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

उत्तर प्रदेशातील दोन कामागार काम करताना ठार

इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे जवळ असणाऱ्या फॅब कंपनीत मुळचे उत्तर प्रदेशातील मोहम्मद सानू खान (२८) व मोहम्मद अनस (२१) दोघे कामगार काम करत होते. त्याचवेळी पत्रा तुटुन खाली पडला. त्यात कामगारांचा मृत्यू झाला आहे.

जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड हे अपघातस्थळी दाखल झाले. मात्र संबंधित कामगार जागीच मृत असल्याने उत्तरीय तपासणी करण्यासाठी त्यांना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रात्री पावणेआठच्या दरम्यान अचानक पत्रा तुटल्याने ते खाली पडले. जास्त उंचावरून पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत माहिती समजताच वाडीवऱ्हेचे पोलीस निरीक्षक अनिल पवार आणि सहकाऱ्यांनी तातडीने भेट देऊन तपासकार्य सुरू केले आहे.

हेही वाचा :Accident : युवक काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वाहनाला ट्रकची धडक; लोकसभा महासचिव रोहित देशमुख ठार

Last Updated : Mar 13, 2022, 9:48 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details