महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

येवल्यात नाग - नागिनीचा कोवळ्या उन्हात विहार...पाहा व्हिडिओ

मार्च ते जून हा कालावधी नाग नागिनीच्या मिलनाचा असतो. त्यामुळे अनेक नाग- नागीन हे या काळात मिलन अवस्थेत आढळत असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.

By

Published : Apr 17, 2021, 7:04 PM IST

येवल्यात नाग - नागिनीचा कोवळ्या उन्हात विहार
येवल्यात नाग - नागिनीचा कोवळ्या उन्हात विहार

नाशिक - येवले शहरातील अंबीया शाह दर्गाह परीसरात नाग नागिनीचे जोडपे विहार करताना दिसून आले. जवळपास सात ते आठ फुट लांबी असलेल्या नाग नागिनने एकमेकांना अलींगन दिलेल्या अवस्थेत नागरिकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केल आहे. हे जोडपे जवळपास एक तास कोवळ्या उन्हात विहार करत होते.

येवल्यात नाग - नागिनीचा कोवळ्या उन्हात विहार

मार्च ते जून हा कालावधी नाग नागिनीच्या मिलनाचा

सदरची वार्ता कळताच नागरीकांनी पहाण्यासाठी एकच गर्दी केली. मात्र, यापैकी त्यांना छेडण्याचे कोणीही धाडस केले नाही. तब्बल एक तासाच्या मिलनानंतर जवळच असलेल्या बिळात या नाग नागिन जोडप्याने प्रवेश केला. भर वस्ती हे दृष्य पाहिल्याने अनेकांनी भितीही व्यक्त केलीय. मार्च ते जून हा कालावधी नाग नागिनीच्या मिलनाचा असतो. त्यामुळे अनेक नाग- नागीन हे या काळात मिलन अवस्थेत आढळत असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details