नाशिक - सटाणा येथून ताहराबादला जात असताना राज्य महामार्गावर एसटी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. एसटीत एकही प्रवासी नसल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र अपघातात बस आणि ट्रक चालक दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना सटाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नाशिक : सटाण्यात एसटी आणि ट्रकचा भीषण अपघात; दोघे अत्यवस्थ
सटाणा येथून ताहराबादला जात असताना राज्य महामार्गावर एसटी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. एसटीत एकही प्रवासी नसल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र अपघातात बस आणि ट्रक चालक दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना सटाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दाट धुक्यामुळे हा अपघात झाल्याचे स्थनिक नागरिकांनी सांगितले. दोन्ही वाहनांची धडक इतकी जोरदार होती की दूरपर्यंत वाहने धडकल्याचा आवाज नागरिकांना ऐकू आला. यामध्ये एसटीचा पुढचा भाग चक्काचूर झाला असून ट्रकचे देखील मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात जीवितहानी झाली नसली, तरी दोन्ही वाहनांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, दिवसेंदिवस थंडीचा कडाका वाढल्याने सर्वत्र धुक्याची चादर पसरत आहे. यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्याचे समोर आले. तसेच धुक्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत असल्याने वाहन चालकांचे आव्हान वाढले आहे.