मालेगाव- शहरातील दोन दुचाकी चोरांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चोरीच्या पाच दुचाकी हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. जिल्हयातील वाढत्या दुचाकी चोरीच्या गुन्हयांना आळा बसविण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई सुरू आहे.
मालेगावातील दुचाकी चोर जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
वाढत्या दुचाकी चोरीच्या गुन्हयांना आळा बसविण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई सुरू असून यात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या.
२८ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास मुंबई आग्रा महामार्गावर मालेगाव तालुका परिसरात गस्त घालत असताना मिळालेल्या माहितीनुसार सवंदगाव फाटा परिसरात काही संशयित कमी किंमतीत दुचाकी विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने मुंबई आग्रा महामार्गावर सवंदगाव फाटा परिसरात सापळा रचून अरोपी अब्दुल सलीम अब्दुल सलाम, म्हाळदे शिवार, मालेगाव याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील हिरो स्प्लेंडर प्लस मोटर सायकलच्या कागदपत्रांबाबत विचारपुस केली असता त्याने ही गाडी मालेगाव शहरातील आंबेडकर पुतळा परिसरातून चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीकडून चोरीच्या आणखी दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. अधिक चौकशी केली असता त्याने साथीदार फरान अंजुम अब्दुल गफार, रा. नवरंग कॉलनी, मालेगाव याच्यासह मालेगाव आणि येवला शहरात चोरी केल्याची कबुली दिली आहे. आरोपी फरान अंजुम याला मालेगाव शहरातील यल्लमा पुल परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. या गुन्ह्याच्या तपासात आरोपींकडून दुचाकी चोरीचे अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.