नाशिक - सर्वत्र बंदीचे आदेश असताना देखील पोलिसांची नजर चुकवत मुंबईतून उत्तर प्रदेशकडे जाणारा एक कंटेनर तसेच दोन ट्रक शहर पोलिसांनी पहाटे पकडले आहेत. यामध्ये मुंबईहून निघालेले ७५० मजूर पकडण्यात आले आहेत. नाशिकच्या विल्होळी परिसरातील गरवारे चौकात पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
मुंबईहून ७५० मजुरांना घेऊन येणारे तीन ट्रक नाशिक पोलिसांच्या जाळ्यात
बंदीचे आदेश असताना देखील पोलिसांची नजर चुकवत मुंबईतून उत्तर प्रदेशकडे जाणारा एक कंटेनर तसेच दोन ट्रक शहर पोलिसांनी पहाटे पकडले आहेत. यामध्ये मुंबईहून निघालेले ७५० मजूर पकडण्यात आले आहेत.
मुंबईहून ७५० मजुरांना घेऊन येणारे तीन ट्रक नाशिक पोलिसांच्या जाळ्यात
आज सकाळी ट्रकमधून बेकायदा ७५० मजूर नाशिकला येत होते. अंबड हद्दीत हे ट्रक आल्यानंतर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर जाधव यांच्या पथकाने त्यांना पकडले. यामध्ये एक कंटेनर असून उर्वरित दोन ट्रक आहेत. संबंधित कारवाईत पोलिसांनी ट्रकचालकांना ताब्यात घेतले असून सर्व मजूरांना वैद्यकीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवले आहे. यानंतर त्यांची रवानगी नासर्डी येथील शासकीय सामाजिक भवनात करण्यात आलीय.