महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भरधाव ट्रक पोलीस चेकपोस्टला धडकून हॉटेलमध्ये घुसला! - accident in news

भरधाव ट्रकने पोलिसांचे बॅरिगेट्स उडवून नजीकच्या हॉटेलला धडक दिल्याची घटना पुणे-इंदौर महामार्गावर आज पहाटे घडली. ट्रक जोरात येत असल्याचे पाहून चेकपोस्ट वरील पोलीस अधिकारी व कर्मचारी वेळीच बाजूला झाल्यामुळे त्यांचा जीव वाचलाय.

nashik accident news
भरधाव ट्रक पोलीस चेकपोस्टला धडकून हॉटेलमध्ये घुसला!

By

Published : Apr 19, 2020, 10:33 AM IST

Updated : Apr 19, 2020, 11:18 AM IST

मनमाड - भरधाव ट्रकने पोलिसांचे बॅरिगेट्स उडवून नजीकच्या हॉटेलला धडक दिल्याची घटना पुणे-इंदौर महामार्गावर आज पहाटे घडली. ट्रक जोरात येत असल्याचे पाहून चेकपोस्ट वरील पोलीस अधिकारी व कर्मचारी वेळीच बाजूला झाल्यामुळे त्यांचा जीव वाचलाय. मात्र पोलीस चौकीला धडक दिल्यानंतर ट्रक शेजारच्या हॉटेलमध्ये घुसल्याने संरक्षक भिंत तुटली आहे. हॉटेल बंद असल्यामुळे पुढील अनर्थ टळला. या अपघातात ट्रक चालक किरकोळ जखमी झाला असून ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाचा वाहनवरून ताबा सुटल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

भरधाव ट्रक पोलीस चेकपोस्टला धडकून हॉटेलमध्ये घुसला!

मनमाडमधून जाणाऱ्या पुणे-इंदौर महामार्गावर सध्या लॉकडाऊनमुळे पोलीस चेकपोस्ट सुरू करण्यात आले आहेत. आज पहाटे याठिकाणी पोलीस कर्मचारी ड्युटीवर आसताना अचानक एक ट्रक भरधाव वेगात येताना दिसला. ट्रकला थांबण्याची सूचना देण्यात आली. मात्र ट्रक थांबणार नसल्याचे लक्षात येताच सर्वांनी रस्त्याच्या बाजूला धाव घेतली; व ट्रक सरळ चेकपोस्ट तोडून रस्त्याच्या कडेला असलेल्या हॉटेलमध्ये घुसला. सध्या हॉटेल बंद असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरीही हॉटेलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

ट्रकचे ब्रेक फेल झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत असून क्रेनच्या सहाय्याने ट्रक बाजूला काढण्यात आलाय. तसेच जखमी चालकावर उपचार सुरू आहेत.

Last Updated : Apr 19, 2020, 11:18 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details