महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर 'मॅट'ची कुऱ्हाड.!

राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांच्या बदल्या अडचणीत आल्या असून वर्षभराच्या आत नियम बाह्य बदल्या केल्याचा ठपका मॅट ने ठेवल्याचे वृत्त आहे. भ्रष्टाचार, नियमबाह्य कामे केलीत म्हणून खाते निहाय चौकशी सुरू असलेल्या अधिकाऱ्यांना दिली पसंतीच्या ठिकाणी बदली.

By

Published : Jul 10, 2019, 3:32 PM IST

राज्य उत्पादन शुल्क कार्यालय

नाशिक- राज्य उत्पादन शुल्क विभागातील, अधीक्षक आणि विभागीय उपायुक्त ह्या वर्ग एक च्या राज्यभरातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी आयुक्तांनी आदेश दिले होते. पण अध्यादेश निघाल्यावर काही तासातच अंमलबजावणी होण्याआधी मॅट ने या प्रक्रियेवर स्थगिती दिली आहे.

सेवा अंतर्गत चौकशी सुरू असलेल्या आणि निलंबन होऊन सेवेत दाखल झालेल्या मोजक्या अधिकाऱ्यांनाच पसंतीच्या ठिकाणी बदल्या मिळाल्या होत्या. यामुळे हा वाद आता मॅटमध्ये गेला आहे. सेवेत असलेल्या काही अधिकाऱ्यांचा वर्षभरचा कार्यकाळही पूर्ण झालेला नाही. यामुळे देखील या बदल्यांबाबत अर्थपूर्ण घडामोडींचा संशय व्यक्त केला जात आहे. बदलीच्या आदेशानंतर नाशिक जिल्हा अधीक्षक कार्यालयात, अधीक्षक पदासाठी विद्यमान अधीक्षकांसह धुळे येथून बदलून आलेले अधीक्षक रुजू झाल्याचा अहवाल सादर केला गेला. या अहवालाबाबत देखील सर्वत्र चांगलीच चर्चा रंगली होती.

या बदल्यांच्या आदेशात तत्काळ पदावरून कार्य मुक्त होऊन नवीन नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश दिले गेले होते. पण आदेश होऊन पाच दिवस उलटले असले, तरी कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी झालेली नाही. यामुळे ह्या बदल्या आता वादात सापडल्याचे स्पष्ट झाले आहे.

विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने, घाईघाईत या बदल्या करण्यात आल्या, अशी सर्वत्र चर्चा आहे. तसेच बदली झालेल्यापैकी काही अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. तर काहींनी नियमबाह्य कामे केलीत म्हणून त्यांची खाते निहाय चौकशी सुरू आहे. अशा अधिकाऱ्यांना देखील पसंतीच्या ठिकाणी बदली मिळाल्याने या बदल्यांमध्ये अर्थपूर्ण घडामोडींचा संशय व्यक्त केला जात आहे.

राज्य उत्पादन शुल्क कार्यालय
ठाण्याचे अधीक्षक म्हणून नितीन घुले यांचा फक्त दहा महिन्यांचा कालावधी पूर्ण झालेला आहे. तरीही त्यांची धुळे येथे बदली करण्यात आली. त्यामुळे त्यांनी थेट मॅटमध्ये धाव घेतली. शासन नियमानुसार किमान तीन वर्षांचा कालावधी पूर्ण होणे आवश्यक असताना, त्याकडे दुर्लक्ष करीत त्यांची नियमबाह्य बदली झाल्याचे निदर्शनास आले. नितीन घुले यांची बाजू ग्राह्य धरून बदलीला स्थगिती दिली गेली. यामुळे आता त्यांच्यासह संपुर्ण राज्यातील बदली प्रक्रिया वादात सापडण्याची चिन्ह आहेत.

बदली झालेले अधिकीरी आणि त्यांची नियुक्त खालील प्रमाणे-
नागपूरच्या यु. आर. शर्मा यांची अंमलबजावणी व दक्षता संचालकपदी,
नाशिकचे उपायुक्त प्रसाद सुर्वे यांची पुण्यात,
पुण्याचे उपायुक्त अर्जुन ओहोळ यांची नाशिक उपआयुक्त पदी,
मुंबई संचालक सुनील चव्हाण यांची ठाण्यातील रिक्त उपायुक्त पदी,
सातारा येथील अधीक्षक स्नेहलता श्रीकर यांची ठाण्याच्या अध्यक्षपदी बदली झाली आहे.
नाशिकचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांची मुंबई शहरात, त्यांच्या जागी धुळ्याचे अधीक्षक मनोहर अंचुळे यांची नियुक्ती करण्यात आली, तर धुळ्यातील रिक्त जागी ठाण्याचे अधीक्षक नितीन घुले यांची बदली करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details