महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिकमध्ये 'रेमडिसिवीर'च्या पुरवठ्यात पारदर्शकता; मेडिकल दुकानांवर औषध साठ्यांचा तपशील उपलब्ध - remdesivir INJECTION

नाशिक जिल्हा प्रशासनाने भरारी पथकांची नेमणूक केली. त्यामुळे आता प्रत्येक मेडिकल दुकानांवर रेमडिसिवीरच्या उपलब्ध साठ्याची व किमतीची माहिती रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांसाठी उपलब्ध होत आहे. पारदर्शकतेसोबतच त्याच्या वितरणात सूसुत्रता आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.

file photo
file photo

By

Published : Sep 30, 2020, 6:12 PM IST

नाशिक - रेमडिसिवीर इंजेक्शनच्या उपलब्धतेबाबत पारदर्शकता यावी, या हेतूने जिल्हा प्रशासनाने भरारी पथकांची नेमणूक केली. त्यामुळे आता प्रत्येक मेडिकल दुकानांवर रेमडिसिवीरच्या उपलब्ध साठ्याची व किमतीची माहिती रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांसाठी उपलब्ध होत आहे. पारदर्शकतेसोबतच त्याच्या वितरणात सूसुत्रता आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रेमडिसिवीरचा तुटवडा व काळाबाजार होत असल्याची माहिती समोर येत होती. त्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाच्या सहआयुक्त माधुरी पवार यांची घटना व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांना भरारी पथकासाठी मनुष्यबळ व वाहनही अधिग्रहित करून देण्यात आले. त्यानंतर ज्या औषध दुकानांमध्ये रेमडिसिवीर इंजेक्शन उपलब्ध आहेत, त्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. सध्या भरारी पथक प्रत्येक औषधालय/ हॉस्पिटल्सना भेट देत असून तेथे उपलब्ध साठ्याची माहिती आणि विक्री यांची शहानिशा करत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात रेमडिसिवीरचा पुरेसा साठा रुग्णांना वेळेवर उपलब्ध होत असून तक्रारीचे प्रमाणही कमी झाले असल्याचे जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले.

जास्तीत जास्त कोविड रुग्णालयांना इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी कोविड रुग्णालयाशी संलग्न एकूण 50 मेडिकल स्टोअरमध्ये 2 हजार 368 रेमडिसिवीर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तसेच एकूण 1 हजार 666 नवीन इंजेक्शन पुन्हा मिळाले आहेत. ज्या रूग्णांना किरकोळ स्वरूपात रेमडिसीवीरची आवश्यकता आहे, त्यांनी वोक्हार्ट हॉस्पिटल, अपोलो हॉस्पिटल आणि अशोका हॉस्पिटल यांच्या औषधालयांमध्ये उपलब्ध आहेत. रेमडिसीवीरचा काळाबाजार होत असेल किंवा यासंदर्भात तक्रार असल्यास अन्न व औषध प्रशासनाच्या हेल्पलाईन क्रमांक 9766811279 व 8780186682 वर तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मांढरे यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details