नाशिक - मुंबईला होत असलेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे, मनमाडहून मुंबईला जाणाऱ्या राजाराणी एक्सप्रेस, पंचवटी एक्सप्रेस, गोदावरी एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.
मुंबईत मुसळधार, रेल्वे व्यवस्था कोलमडली; मनमाडहून मुंबईला जाणाऱ्या तीन एक्सप्रेस रद्द - पाऊस
मनमाडहून मुंबईला जाणाऱ्या राजाराणी एक्सप्रेस, पंचवटी एक्सप्रेस, गोदावरी एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. याच बरोबर उत्तर भारतातून मुंबईकडे जाणाऱ्या अनेक गाड्या उशिराने धावत आहे.
मनमाडहून मुंबईला जाणाऱ्या तीन एक्सप्रेस रद्द
याच बरोबर उत्तर भारतातून मुंबईकडे जाणाऱ्या अनेक गाड्या उशिराने धावत आहे. यामुळे नाशिकहून मुंबईला जाणाऱ्या चाकरमान्यांना सक्तीची सुटी घ्यावी लागली आहे. रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे.
नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी मुंबईत होत असलेल्या जोरदार पावसामुळे रेल्वे ट्रकवर पाणी साचले आहे . यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या ही काही तास उशीराने धावत आहेत.