नाशिक- शहरातील वाहतूक कोंडी फोडण्याएवजी वाहतूक पोलीस जनतेशी अरेरावी करण्यात धन्यता मानत असल्याचे चित्र सध्या नाशिक शहरात पाहायला मिळत आहे. टोईंगच्या कर्मचार्यांकडून आणि वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांशी उद्धटपणे बोलणे, गैरवर्तन, अरेरावी असे प्रकार हे वारंवार घडत आहे. असाच एक वाहतूक पोलिसाच्या अरेरावीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
वाहतूक पोलिसाची ज्येष्ट नागरिकाशी अरेरावी हेही वाचा - विजेचा प्रवाह रस्त्यावरील पाण्यात उतरल्याने रिक्षाचालकाचा मृत्यू
नो पार्किंगमध्ये एका ज्येष्ठ नागरिकाने दुचाकी लावली होती. त्यांची गाडी टोईंग करून वाहतूक पोलिसांनी कार्यालयात आणली. त्यावेळी ज्येष्ठ नागरिकाने आपली चूक मान्य करत दंडाचे पैसे भरून वाहन सोडण्याची विनंती केली. मात्र, एका वाहतूक पोलिसाने त्यांच्याशी मोबाईलवर दंडाची रक्कम भरल्याचा मॅसेज येईल, तो दाखवा म्हणत वाद घातला. तसेच एखादा चोर पकडावा, अशा आविर्भावात वाहतूक पोलिसाने जेष्ठ नागरिकाच्या गाडीची चावी काढून घेतली. मी दंडाचे पैसे भरले आहेत, मला माझ्या गाडीची चावी द्या, अशी विंनती नागरिक करत होते. मात्र, दंड भरल्याचा मॅसेज येणार नाही, तोपर्यंत चावी देता येणार नाही, अशी भूमिका पोलिसांनी घेत अरेरावी केली.
हेही वाचा - पुण्यातील पूरस्थितीकडे लक्ष द्या; मग तिकीट वाटपाच्या चर्चा करा - भुजबळ
या सर्व प्रकाराचे तिथे उभ्या असलेल्या नागरिकांनी मोबाईलमध्ये चित्रण केले. तर ठेकेदाराकडून टोइंग कर्मचाऱ्यांना नो पार्किंगमधून वाहन टोइंग करण्याचे टार्गेट दिले आहे. त्यामुळे हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी अनेकदा पोलीस नो पार्किंगच्या बाजूला असलेली वाहनेदेखील टोइंग करतात, असा आरोप नागरिकांनी केला आहे.