नाशिक:संशयित युक्ता रोकडे हिने तिची तीन महिन्यांच्या मुलगी ध्रुवांशी हिच्या हत्येचा बनाव रचला होता. मात्र, तिने पोलिसांना दिलेल्या जबाबात तफावत आढळल्याने पोलिसांनी तिच्यावर संशय व्यक्त केला. यानंतर पोलिसांसह युक्ताच्या नातलगांनी तिची चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
नियोजन पूर्व हत्या?तीन महिन्यांची मुलगी ध्रुवांशी घरात खेळत असताना तिची आई युक्ता हिने तिच्याच मुलीची हत्या केली. यानंतर ती बेशुद्ध झाल्याचा बनाव केला होता. युक्ता रोकडे हिने नियोजनपूर्व ही हत्या केल्याचे समोर आले. वैद्यकीय तपासणीत ती मानसिकदृष्ट्या सक्षम असल्याचेही पोलिसांनी सांगितले. मात्र ध्रुवांशीच्या जन्मापूर्वी तिचा झालेला गर्भपात आणि जन्मानंतर मद्याच्या आहारी गेलेला पती यामुळे युक्ता रोकडे ही संतापली होती. तिच्यातील द्वेष भावनेचे कारण जाणून घेण्यासाठी ती मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणार असल्याचे उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी सांगितले.
'हा' केला होता बनाव:मी माझ्या घरात माझी तीन महिन्यांच्या मुली सोबत होती. माझी सासूबाई माझ्या मुलीला दूध आणण्यासाठी घराबाहेर गेल्या होत्या. अचानक एक अनोळखी पंजाबी ड्रेस घातलेली महिला माझ्या घरात आली. तिने माझ्या तोंडाला रुमाल लावला आणि मी बेशुद्ध झाले. माझ्या घरच्यांनी मला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याच्या दोन-तीन तासांनंतर मी शुद्धीवर आली. त्यानंतर मला समजले की, माझ्या मुलीची हत्या झाली आहे. माझ्या मुलीची हत्या झालेल्या त्या महिलेला पोलिसांनी लवकरात लवकर शोधून तिला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी तीन महिन्यांच्या चिमुकलीच्या आईने केली होती.