नाशिक- सदृढ आणि निरोगी आयुष्यासाठी आज शेकडो नाशिककर भल्या पहाटे रस्त्यावर धावले. नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या शैक्षणिक संस्थेच्या वतीने तब्बल 12 वर्षांपासून या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येते. यंदाही आंतरराष्ट्रीय हॉकीपटू अजित लाक्रा यांच्या हस्ते या मॅरेथॉनचा शुभारंभ करण्यात आला.
निरोगी आयुष्यासाठी आज हजारो नाशिककर भल्या पहाटे धावले - marathon
सदृढ आणि निरोगी आयुष्यासाठी आज शेकडो नाशिककर भल्या पहाटे रस्त्यावर धावले.
धावताना नाशिककर
या मॅरेथॉनमध्ये 14 वर्षांच्या लहान मुलांपासून ते 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिक कडाक्याच्या थंडीत सदृढ आरोग्याचा संदेश देण्यासाठी नाशिकच्या रस्त्यावर धावताना दिसून आले. नाशिकच्या गंगापूर रोडवरील मॅरेथॉन चौकातून या मॅरेथॉनला सुरवात झाली.
हेही वाचा - थंडी वाढताच नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात भरला पक्ष्यांचा मेळा, पक्षीप्रेमींसाठी पर्वणी