दिंडोरी ( नाशिक )-तालुक्यातीललखमापूर येथे शुक्रवारी दत्तात्रय शार्दुल या व्यक्तीने त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. दत्तात्रय शार्दुल याचे वय 35 वर्षे होते.
दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथील ३५वर्षीय युवकाची आत्महत्या - नाशिक लेटेस्ट न्यूज
लखमापूर गावातील दत्तात्रय शार्दुल या व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली होती. त्याच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच वणी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
लखमापूर येथील दत्तात्रय रमेश शार्दुल उर्फ बंजा या युवकाने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच वणी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या घटनेचा रितसर पंचनामा केल्यानंतर मृतदेह खाली उतरवण्यात आला. यानंतर रमेश शार्दुलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी वणी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
वणी पोलीस ठाण्यात शार्दुल याच्या आकस्मिक मृत्यूची नोंद झाली असून पोलीस निरीक्षक प्रविण पाडवी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गोपाळ भोये, कुणाल मराठे,प्रदीप शिंदे, अधिक तपास करत आहेत. लखमापूर अमरधाममध्ये शोकाकूल वातावरणात दत्तात्रय शार्दुल याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत दत्तात्रय शार्दुलच्या पश्चात आई,वडील,पत्नी, एक मुलगा ,एक मुलगी, भाऊ, भावजई असा परिवार आहे. दत्तात्रयच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.