महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संकटमोचकांच्या पक्षातच संकट? महापौर निवडणुकीत भाजपमध्ये बंडखोरीची शक्यता - Nashik BJP latest news

नाशिक महानगरपालिकेत होणाऱ्या महापौर निवडणुकीत आता चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. अडीच वर्षात सर्वाधिक संख्याबळ घेऊन सभागृहात भाजपने महापौर, उपमहापौर, स्थायी समिती, सभागृहनेते पद अशी एक हाती सत्ता मिळवली होती. मात्र, या पंचवार्षिक मधील दुसऱ्या टप्प्यात भाजपला चांगलीच कसरत करावी लागणार आहे.

महापौर निवडणुकीत भाजपात बंडखोरी शक्यता

By

Published : Nov 22, 2019, 9:03 PM IST

नाशिक -नोव्हेंबरला होणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत आता चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. पहिल्या अडीच वर्षात सर्वाधिक संख्याबळ घेऊन सभागृहात भाजपने महापौर, उपमहापौर, स्थायी समिती, सभागृहनेते पद अशी एक ना अनेक ठिकाणी एक हाती सत्ता मिळवली. मात्र, या पंचवार्षिक मधील दुसऱ्या टप्प्यातील महापौरपदासाठी भाजपला चांगलीच कसरत करावी लागत आहे.

महापौर पदाच्या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. त्यातच राज्याच्या राजकारणाचा परिणाम महापौरपदाच्या निवडणुकीवर होत असल्याने शिवसेनेनेही रामायण या महापौर बंगल्यावर भगवा फडकवण्यासाठी सर्व ताकद पणाला लावली आहे. मात्र, दुसरीकडे ही ताकद लावतांना शिवसेनाला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेच्या उंबरठे झिझवावे लागत आहे. पुरेसे संख्याबळअर्थात 61 चा जादुई आकडा गाठण्यासाठी भाजपच्या जवळपास नऊ नगरसेवकांना शिवसेनेनं गळाला लावले. यात प्रामुख्याने विद्यमान महापौर रंजना भानसी पॅनेल मधील प्रभाग क्रमांक एकच्या नगरसेविका पूनम धनगर, स्थायी समिती सभापती उद्धव निमसे यांच्या प्रभाग 2 मधील पूनम सोनवणे, प्रभाग 3 मधील माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे पुत्र मच्छिंद्र सानप, माजी प्रभाग सभापती प्रियंका माने, प्रभाग पाच मधील नगरसेवक कमलेश बोडके, पंचवटी प्रभागाच्या विद्यमान सभापती सुनिता पिंगळे, प्रभाग 7 च्या नगरसेविका अनिता सातभाई, नाशिकरोड प्रभाग समितीचे सभापती विशाल संगमनेरे, प्रभाग 20 च्या नगरसेविका सीमा ताजणे या भाजप नगरसेवकांचा समावेश आहे, हे सर्व विधानसभा निवडणुकीत नाशिक पूर्व मधून भाजपची उमेदवारी नाकारलेले माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे खंदे समर्थक आहेत त्यामुळे महापौर निवडणुकीत सर्वाधिक फटका भाजपला नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून बसू शकतो.

या मतदारसंघात पालकमंत्री गिरीश महाजन यांनी बाळासाहेब सानप यांच्या ऐवजी मनसेतून भाजपत दाखल झालेले राहुल ढिकले यांना उमेदवारी देऊ केली होती. त्यामुळे सानप समर्थक तसेच नगरसेवक नाराज झाला होते. हे सर्व बाळासाहेब सानप यांच्या सूचनावजा आदेशाने काम करतील असे बोलले जात आहे. असे झाले तर भाजपला महापौर-उपमहापौर शाबूत ठेवायचे असेल तर मनसेला बरोबर घ्यावाच लागणार आहे. शिवाय वेळ पडल्यास काँग्रेस बरोबर ही युती करावी लागणार आहे. भाजपचे संकट मोचक असलेले गिरीश महाजन यांच्यावर जबाबदारी असलेली महापौरपदाची निवडणूक भाजपला कोणत्याही परिस्थितीत जिंकावीच लागेल हे ही तितकच खर आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details