महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nashik Accidental Death : रुग्णालयातील लिफ्टच्या खड्ड्यात पडून तरुणाचा मृत्यू - नाशिक क्राईम न्यूज

2 मार्च सायंकाळी सुमारास लिफ्टच्या दरवाज्यावर पोस्टर चिटकवताना अश्फाक शब्बीर नगीनेवाले हा तरुण लिफ्टच्या खड्यात खाली पडल्याने व त्याला जबर मार लागला. आणि यात तरुणाचा (Nashik Accidental Death ) दुर्देवी मुत्यू झाला आहे.

तरुणाचा दुर्दैवी मुत्यु
तरुणाचा दुर्दैवी मुत्यु

By

Published : Mar 3, 2022, 5:33 PM IST

नाशिक :-नाशिकच्या मानवता कॅन्सर रुग्णालयाच्या लिफ्टच्या खड्ड्यात पाचव्या मजल्यावरून पडून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पोलिसांनी दिली माहिती

मुंबई नाका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
नाशिकच्या मुंबई नाका येथिल नामांकित मानवता कॅन्सर हॉस्पिटलमध्ये ठेकेदारामार्फत पोस्टर लावण्याचे काम दिले होते. 2 मार्च सायंकाळी सुमारास लिफ्टच्या दरवाज्यावर पोस्टर चिटकवताना अश्फाक शब्बीर नगीनेवाले हा तरुण लिफ्टच्या खड्यात खाली पडल्याने व त्याला जबर मार लागला. आणि सदर तरुणाचा दुर्देवी मुत्यु झाला आहे. याबाबत मुंबई नाका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच मृत तरुणाच्या नातेवाईकांनी या प्रकरणी हॉस्पिटल प्रशासनाला जबाबदार धरले आहे. जो पर्यंत हॉस्पिटल विरोधात गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली होती. मात्र, पोलिस प्रशासनाकडून या घटनेबाबत कारवाईची व हॉस्पिटल प्रशासनाकडून आर्थिक मदतीचे आश्वासन देण्यात आले आहे. त्याचबरोबर तरुणाच्या बायकोला नोकरी देण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे.

दोषींवर कारवाई करण्याची मागणी
हॉस्पिटलच्या पाचव्या मजल्यावरच्या लिफ्टच्या दरवाजाला स्टिकर चिटकवण्यासाठी अश्फाक गेला तेव्हा लिफ्ट पहिल्या मजल्यावर होती? दरवाजा कसा उघडला ? हे प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलिसांनी योग्य तपास करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी मृताचे नातेवाईक करत आहे.

हेही वाचा -Nagpur Crime News : तलवारीच्या धाकाने व्यवस्थापकाला 3 लाखांना लुटले; पोलिसांनी 12 तासांत पकडले

ABOUT THE AUTHOR

...view details