महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिल्ह्यात व्हेंटिलेटर खाटांची संख्या वाढणार; ऑक्सिजनची समस्या मार्गी लावणार - पालकमंत्री

सध्या नाशिक जिल्ह्यात ऑक्सिजनची कमतरता भासत असून पुरवठा करणाऱ्या टँकर समस्या भासत आहे. याबाबत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी फोनवर मंत्री डॉ. राजेंद्र शिंगे यांच्याशी चर्चा केली. यावेळी उद्यापर्यंत दोन टँकर उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती भुजबळ यांनी दिली.

बैठकीवेळचे छायाचित्र
बैठकीवेळचे छायाचित्र

By

Published : Sep 17, 2020, 5:38 PM IST

नाशिक - जिल्ह्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणत वाढत आहेत. अशात शहरात व्हेंटिलेटर खाटांची कमतरता जाणवत असून सध्य स्थितीत केवळ सहा व्हेंटिलेटर खाटा उपलब्ध आहेत. भविष्यात रुग्ण संख्या वाढल्यास उपाययोजना म्हणून महानगरपालिका, जिल्हा आरोग्य विभाग आणि खासगी रुग्णालयाच्या माध्यमातून पुढील आठ दिवसात 72 व्हेंटिलेटर खाटा तयार करण्यात येणार आहेत. तसेच ऑक्सिजनचा पुरवठा देखील सुरळीत करणार असल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

माहिती देताना पालकमंत्री
नाशिक जिल्ह्यात कोरोना बधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून रोज कोरोना बाधित रुग्ण संख्येत दीड ते दोन हजार रूग्णांची भर पडत आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत 57 हजार 888 जणांना कोरोनाची लागण झाली असून 1 हाजर 91 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. अशात रोज वाढणाऱ्या रुग्ण संख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण वाढला आहे. शहरातील सर्वच कोविड रुग्णालयांमधील व्हेंटिलेटर व ऑक्सिजन खाटा भरले असून खाटा उपलब्ध नसल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहे.

याबाबत नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी कोरोना आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील कोरोना बाबतच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता जाणवत असून ऑक्सिजन पुरवठा करणारे टँकर उपलब्ध होत नसल्याचे अधिकाऱ्यांनी भुजबळ यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर पालकमंत्री भुजबळ यांनी फोनवर मंत्री डॉ. राजेंद्र शिंगे यांच्याशी चर्चा केली. यावेळी शिंगणे यांनी उद्यापर्यंत नाशिक जिल्ह्याला दोन ऑक्सिजन टँकर देणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच पुढील आठ दिवसात जिल्ह्यात महानगरपालिका, जिल्हा आरोग्य विभाग आणि खासगी रुग्णालयाच्या माध्यमातून 72 व्हेंटिलेटर खाटा तयार करणार असल्याचे भुजबळांनी सांगितले.


नाशिक जिल्ह्यात सध्या ऑक्सिजन निर्मिती करणारे 6 कारखाने आहेत. त्या कारखान्याच्या माध्यमातून रोज 4 हजार 733 ऑक्सिजन सिलिंडर तयार होते. उद्योगासाठी वापरण्यात येणारा 80 टक्के ऑक्सिजन आरोग्यासाठी वापरणार असल्याची माहित पालकमंत्री भुजबळ यांनी दिली.

हेही वाचा -कांदा निर्यातबंदी : येवल्यातील एरंडगावात प्रहारचे मुंडन आंदोलन

ABOUT THE AUTHOR

...view details