नाशिक- पुढील मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असल्याचे शिवसेनेने आधीच जाहीर केले होते. त्यानंतर यात भाजपनेही उडी घेतली आहे. कोणाचे काहीही असो मुख्यमंत्री भाजपचाच होणार असल्याचे वक्तव्य भाजपच्या महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे यांनी नाशिकमध्ये केले.
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच - सरोज पांडे - भाजप
यावेळीही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भाजपचाच होणार आहे. देशात भाजप अत्यंत मजबूत पक्ष असून अनेक लोक भाजपमध्ये यायला इच्छुक आहेत. देशात मोदी आणि राज्यात देवेंद्र यांच्यावर लोकांचा विश्वास आहे, म्हणून राज्यात मुख्यमंत्री भाजपचाच होणार असल्याचे सरोज पांडे यांनी सागितले.
सर्व सदस्यता अभियान 2019 अंतर्गत आज नाशिकमध्ये जिल्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला राष्ट्रीय सहसचिव महाराष्ट्र प्रदेश प्रभारी सरोज पांडे या उपस्थित होत्या. या बेठकीपुर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
राज्यात विधानसभा निवडणूक होऊ घातल्या असून याच पार्श्वभूमीवर आज बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत खासदार पांडे यांनी सांगितले की, यावेळीही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भाजपचाच होणार आहे. देशात भाजप अत्यंत मजबूत पक्ष असून अनेक लोक भाजपमध्ये यायला इच्छुक आहेत. देशात मोदी आणि राज्यात देवेंद्र यांच्यावर लोकांचा विश्वास आहे, म्हणून राज्यात मुख्यमंत्री भाजपचाच होणार असल्याचे सरोज पांडे यांनी सागितले. या वक्तव्यावरून शिवसेना- भाजपमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.