महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गंगापूर धरण 71 टक्के भरले; नाशिककरांवरील पाणी कपातीचे संकट तूर्तास टळले

नाशिक जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण 71 टक्के भरले आहे. यामुळे नाशिककरांवरील पाणी कपातीचे संंकट दूर झाले आहे.

file photo
file photo

By

Published : Aug 15, 2020, 3:15 PM IST

नाशिक -जिल्ह्यातगेल्या चार दिवसांपासून होत असलेल्या संततधार पावसामुळे नाशिक शहाराला पाणी पुरवठा करणारे धरण 71 टक्के भरले आहे. यामुळे सध्यातरी नाशिककरांवरील पाणी कपातीचे संकट दूर झाले आहे.

नाशिकमध्ये जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पावसाने दडी मारल्याने नाशिकमध्ये पाणी कपात करावी लागेल, असे संकेत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले होते. तसेच गंगापूर धरणातील पाणीसाठा समाधानकारक नसेल तर 17 ऑगस्टपासून दिवसातून एकच वेळ पाणी पुरवठा केला जाईल, असा निर्णय महानगरपालिकेच्या महासभेत झाला होता.

मात्र, गेल्या चार दिवसांपासून नाशिकसह गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या संतातधार पावसामुळे नाशिकच्या धरणातील पाणीसाठा 45 टक्केहून 71 टक्के पर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे आता ऑगस्ट महिन्याच्या अखेर पर्यंत तरी नाशिककरांवरील पाणी कपातीचे संकट टाळले आहे. मागील वर्षी नाशिकमध्ये सुरुवातीपासून पाऊस झाल्याने आजच्या दिवशी गंगापूर धरणात 82 टक्के इतका पाणी साठा होता.

नाशिकच्या प्रमुख मोठ्या धरणातील पाणीसाठा

गंगापूर धरण - 71 टक्के
करंजवण धरण - 33 टक्के
दारणा धरण - 92 टक्के
मुकणे - 54 टक्के
कडवा - 75 टक्के
चनकापूर - 35 टक्के
गिरणा - 75 टक्के

नाशिक जिल्ह्यात एकूण 24 लहान-मोठी धरणे असून यात सद्यस्थितीत उपयुक्त पाणीसाठा 37 हाजर 212 दशलक्ष घनफुट इतका आहे. सरासरी सर्व धरण मिळून 57 टक्के इतका पाणी साठा आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details