नाशिक - उत्तर प्रदेशातील हाथरस येथील बलात्कार प्रकरणी कठोर कारवाई करावी, आरोपींना भर चौकात फाशी द्यावी यासह आरोपींना मदत करणाऱ्या पोलिसांना निलंबित करून सखोल चौकशी करावी यासाठी वंचित बहुजन आघाडी व बहुजन युवक संघातर्फे मंडळ अधिकारी कैलास चौधरी यांना निवेदन देण्यात आले.
हाथरस येथील बलात्कार प्रकरणी कठोर कारवाई करा; मनमाड येथील वंचित बहुजन युवक संघातर्फे निवेदन - hathras news
बलात्कार प्रकरणी कठोर कारवाई करावी, आरोपींना भर चौकात फाशी द्यावी यासह आरोपींना मदत करणाऱ्या पोलिसांना निलंबित करून सखोल चौकशी करा-वी यासाठी वंचित बहुजन आघाडी व बहुजन युवक संघ तर्फे निवेदन देण्यात आले.
कारवाईसाठी निवेदन देतांना
उत्तर प्रदेशातील हाथरस येथील एका दलित मुलीवर काही नराधमांनी बलात्कार करत तिच्यावर अमानुषपणे अत्याचार केले. यात त्या मुलीचा मृत्यु झाला. तर काही पोलिसांनी त्या गुंडांना मदत केली. त्यामुळे या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करत आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी व बहुजन युवक संघ यांनी निवेदन देऊन केली. यावेळी केंद्र सरकार व उत्तर प्रदेश सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
Last Updated : Oct 1, 2020, 7:10 PM IST