येवला (नाशिक) - येवला तालुक्यातील अंदरसूल येथील एका तरुणाने लग्न जमत नसल्यामुळे आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अमोल गणपत जाधव ( वय 21) असे या तरुणाचे नाव आहे.
लग्न जमत नसल्याच्या नैराश्येतून येवल्यात तरुणाची आत्महत्या - nasik crime news
अंदरसुल येथील शेतात राहात असलेल्या गणपतराव जाधव यांचा मुलगा अमोल जाधव याने लग्न जमत नसल्यामुळे गळफास घेऊन आत्महत्या केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, अंदरसुल येथील शेतात राहत असलेल्या गणपतराव जाधव यांचा मुलगा अमोल जाधव याने लग्न जमत नसल्यामुळे गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी येवला ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
अंदरसुलमध्ये अमोल मोबाईल शॉपीचे दुकान चालवत होता. बऱ्याच ठिकाणचे स्थळ बघितले. परंतु, लग्न न जमल्याने अमोल जाधव या युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत अधिक तपास येवला ग्रामीण पोलीस ठाण्याचे ए.एस.आय. तांदाळकर करत आहेत.