महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ऊसतोड कामगारांना घेऊन जाणारा ट्रक घाटात उलटला; एकाचा मृत्यू, 8 गंभीर जखमी - ऊसतोड कामगारांना घेऊन जाणारा ट्रक घाटात उलटला बातमी

नांदगांव जवळील ढेकू येथील ऊसतोड कामगार कारखान्यावर जात होते. दरम्यान, कासारी घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्यांचा ट्रक घाटात खोल दरीत कोसळला. यात एक जणाचा जागीच मृत्यू झाला. तर 8 ते 10 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना नांदगांव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

truck-accident-in-nandgoan-nashik
ऊसतोड कामगारांना घेऊन जाणारा ट्रक घाटात उलटला

By

Published : Nov 30, 2019, 8:16 AM IST

नाशिक- ऊसतोड कामगारांना घेऊन जाणाऱ्या ट्रकचा नांदगांव जवळील कासारी घाटात अपघात झाला आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी घाटात उलटली. यात एक जण जागीच ठार झाला तर 8 ते 10 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमींना तत्काळ नांदगांव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ऊसतोड कामगार हे तालुक्यातीलच असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा-आरे कारशेडच्या कामाला स्थगिती; मुख्यमंत्री ठाकरेंची मोठी घोषणा

नांदगांव जवळील ढेकू येथील ऊसतोड कामगार कारखान्यावर जात होते. दरम्यान, कासारी घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्यांचा ट्रक घाटात खोल दरीत कोसळला. यात एक जणाचा जागीच मृत्यू झाला. तर 8 ते 10 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना नांदगांव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आजूबाजूला असणाऱ्या लोकांच्या हा प्रकार लक्षात आला त्यानंतर मदतकार्य सुरू करून जखमींना उपचारासाठी हलविण्यात आले.

ऊसतोड कामगारांना घेऊन जाणारा ट्रक घाटात उलटला

रात्रीची वेळ असल्याने मदतकार्य मिळण्यास उशीर झाला. मात्र, स्थानिक नागरिक आणि पोलीस यांनी मिळून सर्व जखमींना नांदगांव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तर काही जखमींना चाळीसगांव व मालेगाव येथे अधिक उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. नांदगांव तालुक्यातील कासारी घाट हा अगदी वळणाचा रस्ता असून त्याची रुंदी कमी असल्याने या भागात कायम अपघात होतात. या रस्त्याची रुंदी वाढवावी यासाठी अनेकदा निवेदने देण्यात आली. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details