महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

BAC Panipuriwala : बीएसी पाणीपुरीवाला, तरुणाची स्वतःच्या व्यवसायातून भरारी

बीएसी शिक्षण करुन स्पर्धा परीक्षेसाठी प्रचंड अभ्यास केल्यानंतरही यश न मिळाल्याने नाशिकच्या तरुण निराश न होता बीएससी नावाने पाणीपुरीचा व्यवसाय सुरू केला आहे. यातून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. कुठले ही छोटे किंवा मोठे नसते असे म्हणत त्यांना नोकरी न मिळलेल्या तरुणांना संदेश दिला आहे .

BAC Panipuriwala
बीएसी पाणीपुरीवाला

By

Published : Jan 31, 2023, 7:45 PM IST

बीएसी पाणीपुरीवाला

नाशिक :गंगापूर रोड येथील प्रमोद महाजन गार्डन जवळ भूषण उगले हा बीएसी चाटवाला, पाणीपुरीवाला नावाने छोटासा गाडा लावतो. मात्र, या आधीचा भूषणचा संघर्ष तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. भूषण हा मूळचा सिन्नर तालुक्यातील बारागाव पिंपरीचा आहे. गेल्या अनेक वर्षापासून तो कुटुंबासोबत नाशिकरोड परिसरात राहतो. घरची परिस्थिती बेताची वडील लहान मोठी नोकरी करतात. तर आई गृहिणी आहे. लहानपणापासूनच हुशार असलेल्या भूषणचं शिक्षण नाशिक शहरात झाले. भूषणने सरकारी अधिकारी व्हावे अशी आई-वडिलांची इच्छा होती. आई-वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी भूषण ने बारावीनंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला.

यशाने दिली हुलकावणी :स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी पुणे गाठले. पुण्यात एमपीएससी, इतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला. त्यात एका मार्कामुळे त्याला यशाने हुलकावणी दिली. परत तो नाशिकला आला. सुरवातीला मेडिकलमध्ये नोकरी केली. मात्र, जेमतेम पैसे मिळत असल्याने त्याने स्वतःचा व्यवसाय करायचा निर्णय घेतला. अशात व्यवसाय करायचा म्हणजे भांडवल पाहिजे म्हणून त्यांने रस्त्याच्या कडेला गाडा लावला. बीएससी शिक्षण झाले म्हणून त्यांना आपल्या व्यवसायाला बीएससी चाटवाला,पाणीपुरीवाला सेंटर असे नाव दिले. या ठिकाणी पाणीपुरी, भेळपुरी, शेवपुरी, रगडा पॅटीस असे पदार्थ त्यांन सुरू केले. आज नोकरी पेक्षा स्वतःचा व्यवसाय आहे दोन पैसे अधिक मिळतात याचे समाधान असल्याचं भूषण सांगतो.

तरुणांनी व्यवसायात उतराव :सध्या शिक्षण करूनही नोकरी मिळत नाही. आत्ताच झालेल्या पोलीस भरतीमध्ये हजार जागांसाठी लाखो विद्यार्थी परीक्षा देतात. मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. चांगले शिक्षण करूनही नोकरी मिळाली तीही तुटपुंजा पैशाची. त्यात कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा हा मोठा प्रश्न होता. युवकांनी नोकरी मिळत नाही म्हणून हताश न होता, छोट्या व्यवसायापासून सुरुवात करावी असे भूषण म्हणाला. व्यवसायात सातत्य ठेवले तर यश नक्कीच मिळते असा कानमंत्र भूषणने तरुणांना दिला ओहे.




हेही वाचा -Asaram Bapu Sentenced Life Imprisonment: बलात्कार प्रकरणात वादग्रस्त आसारामला जन्मठेपेची शिक्षा.. न्यायालयाचा निकाल

ABOUT THE AUTHOR

...view details