नाशिक - नांदगाव तालुक्यातील तांबेवाडीच्या विद्यार्थ्यांवर मंदिरात शिक्षण घेण्याची वेळ आली आहे. शाळेला इमारत नसल्याने मागील तीन वर्षांपासून तांबेवाडीची शाळा मंदिरात भरत आहे. याबाबत प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही त्यांनी काहीच कारवाई केलेली नाही.
तांबेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. इमारतीच्या अर्ध्या भागातील स्लॅब पूर्णपणे गायब झाला आहे. त्यामुळे शाळेतील विद्यार्थी ऊन-वारा-पाऊस यांचा सामना करत शिक्षण घेत होते. शेवटी हा त्रास असह्य झाल्याने गावातील विठ्ठल-रुक्मिणी, मारूती मंदिरात काही वर्ग भरवण्यात येत आहेत. गावाच्या समाज मंदिरात काही वर्ग आणि एक वर्ग शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षाच्या घरी भरत आहे.