महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Illegal liquor smuggling : त्र्यंबकेश्वरमध्ये राज्य उत्पादन शुल्कची मोठी कारवाई, टोमॅटोच्या कॅरेटमधून मद्याची तस्करी

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करून लाखोंचा अवैद्य मद्य (Illegal liquor smuggling) साठा जप्त केला आहे. या कारवाईत पिकअप गाडीमधून सहा लाखांची तब्बल ११२ बॉक्स आणि पिकअप गाडी असा जवळपास पंधरा लाखांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने हस्तगत केला आहे.

state-excise-department
state-excise-department

By

Published : Dec 20, 2021, 5:36 PM IST

Updated : Dec 20, 2021, 5:43 PM IST

नाशिक - नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करून लाखोंचा अवैद्य मद्य साठा जप्त केला आहे. अवैध मद्याची वाहतूक करणाऱ्यांचे प्रमाण सध्या वाढल्याचे दिसून येत आहे. ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर ही अवैध मद्य वाहतूक (Illegal liquor smuggling ) वाढली असून राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देखील या अवैध मद्य वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. सहा लाखाची तब्बल ११२ बॉक्स आणि पिकअप गाडी असा जवळपास पंधरा लाखाचा माल जप्त करण्यात आला आहे.

टोमॅटोच्या कॅरेटमधून मद्याची तस्करी
३१ डिसेंबरच्या पार्शवभूमीवर अवैध मद्य वाहतुकीचे प्रमाण वाढले -
३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सध्या अवैध मद्याची वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आज नाशिकच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने सिल्वासा प्रदेशातील महाराष्ट्रात प्रतिबंध असलेले दारू जप्त केली आहे. या कारवाईत पिकअप गाडीमधून सहा लाखांची तब्बल ११२ बॉक्स आणि पिकअप गाडी असा जवळपास पंधरा लाखांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने हस्तगत केला आहे.


हे ही वाचा -TET Exam Scam : दुसऱ्या धाडीतही तुकाराम सुपेंच्या घरी मिळाले घबाड.. 2 कोटीहून अधिक रोखड व सोने जप्त

या अवैध दारू तस्करांनी गाडीच्या मागे टोमॅटोचे कॅरेट ठेवून आतमध्ये दारू विक्रीसाठी आणली होती. मात्र गुप्त माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाने त्र्यंबकेश्वर तळवाडे ग्रामीण भागातून ही कारवाई केली आहे.

Last Updated : Dec 20, 2021, 5:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details