महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

33 कोटी वृक्ष लागवडीकडे झेप, नाशिकमध्ये वृक्षलागवडीच्या उपक्रमाला दमदार सुरुवात - मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे

शासनाच्या 33 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नाशिक महानगरपालिकेने आता कंबर कसली आहे.

33 कोटी वृक्ष लागवडीकडे झेप, नाशिकमध्ये वृक्षलागवडीच्या उपक्रमाला दमदार सुरूवात

By

Published : Jul 1, 2019, 7:51 PM IST

नाशिक- शासनाच्या 33 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नाशिक महानगरपालिकेने आता कंबर कसली आहे. त्यासाठी महापालिकेने आजपासून शहरातील ठिकठिकाणी वृक्षारोपणाला सुरुवात केली आहे.

33 कोटी वृक्ष लागवडीकडे झेप, नाशिकमध्ये वृक्षलागवडीच्या उपक्रमाला दमदार सुरूवात

महापालिकेच्या आयुक्त, महापौर, उपमहापौर, गटनेते आणि नगरसेवकांनी यामध्ये सहभाग घेतला. झाडे लावण्याबरोबरच त्यांच्या संवर्धनासाठी देखील यंत्रणा राबवण्यात आली आहे. यामध्ये ऑक्सिजन देणारी आणि देशी झाडे लावण्यात येणार आहेत.

शहरात पावसाच्या दमदार आगमनानंतर वृक्षलागवडीस सुरूवात करण्यात आली आहे. यामध्ये 80 हजार झाडे लावण्यात येणार असून त्यांच्या संगोपनाची जबाबदारी विविध संस्था घेतली आहे. दरम्यान, यावेळी मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सामाजिक संस्था आणि नाशिककरांना वृक्षलागवडीच्या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले.

ABOUT THE AUTHOR

...view details