नाशिक - सुफी संत हजरत पीर सय्यद सादिकशहा हुसेन बाबा यांच्या बारा दिवसीय वार्षिक यात्रा उत्सवाला आणि उरूसाला आजपासून सुरूवात झाली. या काळात हिंदू-मुस्लीम भाविक मोठ्या संख्येने या दर्ग्याला भेटी देत असतात.
नाशिकमधील बडी दर्गा येथील हुसेनी बाबा यांच्या उरुसाला उत्साहात प्रारंभ - उरूस
नाशिककरांचे श्रद्धास्थान असलेले सुफी संत हजरत पीर सय्यद सादिकशहा हुसेन बाबा यांच्या उरूसाला आजपासून सुरुवात झाली आहे.
दरवर्षीप्रमाणे यात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी पहिली चादर बडी दर्ग्यामधील मजारवर चढविण्याचा मान वर्षानुवर्षांपासून भद्रकाली पोलिसांना दिला जातो. या वर्षीही ही प्रथा पाळण्यात आली. भद्रकाली पोलिसांकडून विधीवत डफलीच्या निनादाने मिरवणूक काढण्यात आली होती. भद्रकाली पोलीस ठाण्यासह पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सायंकाळी उपस्थित राहून बाबांच्या मंजारवर चादर अर्पण केली.
यात्रेत सहभागी होताना भाविकांनी कापडी चादर ऐवजी फुलांच्या चादरी मंजार शरीफवर अर्पण करण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन विश्वस्तांकडून करण्यात आले आहे. कापडी चादरीवरील अनावश्यक खर्च टाळून गोरगरिबांना मदतीचा हात द्यावा, हा यामागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.