नाशिक- दिवसेंदिवस शहरात गुन्हेगारी वाढत असून यावर आळा घालण्यासाठी पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमे अंतर्गत शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाणे हद्दीतील 36 गुन्हेगारांच्या घरी छापे मारण्यात आले. या कारवाई दरम्यान, पोलिसांनी विविध ठिकाणाहून 20 गुन्हेगारांकडुन 37 शस्त्र जप्त केले असुन या संशयित गुन्हेगारांना अटककरुन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.
नाशिक शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असून,अनेक ठिकाणच्या गुन्ह्यात धारदार शास्त्राचा वापर केल्याचे आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त दिपक पांडये यांच्या आदेशानुसार, शहरातील गुन्हेगारांच्या घरी एकाच वेळी 36 ठिकाणी छापे टाकण्यात आले तर 20 आरोपींकडे पोलिसांना 37 शस्त्र मिळून आलेत आहेत यामध्ये 1 गावठी कट्टा,5 जिवंत काडतुसे,10 तलवारी,10 कोयते,7 चॉपर, 2 चाकू यांचा समावेश आहे.