कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून करण्यात आलेल्या रास्तारोकोमध्ये शरद पवार सहभागी झाले नाशिक Sharad Pawar On Farmers Issue: सोमवारी चांदवडमध्ये मुंबई-आग्रा महामार्गावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून करण्यात आलेल्या रास्तारोकोमध्ये शरद पवार सहभागी झाले होते. यावेळी शरद पवार यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या दुर्दशेसाठी केंद्र सरकारला जबाबदार धरलं. हा एक निर्णय कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त करणारा आहे. त्यामुळं कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवली पाहिजे, अशी मागणी शरद पवार यांनी केलीय.
शेतकऱ्यांच्या व्यथा दिल्लीत मांडणार: सरकारच्या धोरणांची शेतकरी आज किंमत मोजत आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा दिल्लीत मांडणार आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानं साखर कारखान्यात इथेनॉल निर्मिती थांबविल्यानं ऊस उत्पादक आणि कारखाने उद्धवस्त होणार आहेत. केंद्र सरकारनं वारंवार धोरण बदलणे योग्य नाही, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं. ते आज चांदवडमध्ये माध्यमांशी बोलत होते.
आंदोलनामुळे सरकारची झोप उडाली: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, आजच्या आंदोलनामुळे सरकारची झोप उडाली आहे. केंद्र सरकारनं कांदा निर्यातबंदी उठविली पाहिजे. कांदा निर्यातीत सरकारचा हस्तक्षेप नसावा. रास्ता रोको केल्याशिवाय सरकारला कळत नाही. योग्य मोबदला मिळाल्यास आंदोलनाची गरज नाही. सरकारला शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव नाही. अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
सरकारची धरसोड वृत्ती योग्य नाही-सरकारच्या वारंवार बदलणाऱ्या धोरणामुळे आंतराष्ट्रीय बाजारावर परिणाम होतो. केंद्र व राज्य सरकारनं शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे. केंद्र आणि राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मार्ग काढला पाहिजे. १० दिवस होऊनही पीक नुकसानीचे पंचनामे झाले नाहीत. कांदा प्रश्नी मी उद्या दिल्लीत जाणार आहे. मदत करू म्हणून घोषणा करतात. पण,अजूनही पंचनामे झाले नाहीत. अतिवृष्टीच्या नुकसानीची अद्याप शेतकऱ्यांना भरपाई नाही. सरकारची धरसोड वृत्ती योग्य नाही.
हेही वाचा -
- 132 जणांना शरद पवार इन्स्पायर फेलोशिप प्रदान; शरद पवार यांनी दिला आठवणींना उजाळा
- शरद पवारांचे खरे राजकीय वारसदार अजित पवारचं - उदयकुमार आहेर
- राष्ट्रवादी पक्षासह चिन्ह काकाचं की पुतण्याचं? निवडणूक आयोग दोन ते तीन आठवड्यात निकाल देण्याची शक्यता