नाशिक - नवीन भारत उभा करण्यासाठी गांधी घराण्याने बलिदान दिले. आजही गांधी कुटुंब मागे न हटता देशासाठी योगदान देत आहे. पण, भाजप त्यांच्यावर व्यक्तिगत हल्ले करण्याचे काम करीत असून, आता पुढचा हल्ला माझ्यावर करतील. नरेंद्र मोदी यांच्याकडे सांगण्यासारखे काही शिल्लक आहे का? असा सवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.
माझ्या घराची चिंता करण्याऐवजी मोदींनी शेतकऱ्यांची चिंता करावी - पवार
दिंडोरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले हे निवडणूक लढवत आहेत. त्यांना भाजपच्या डॉ. भारती पवार आणि मार्क्सवादी पक्षाचे जीवा पांडू गावीत यांचे आव्हान आहे. त्यामुळे दिंडोरीची निवडणूक तिरंग होण्याची शक्यता सांगितली जात आहे.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धनराज महाले यांच्या प्रचारासाठी नांदगाव येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. पवार म्हणाले, की माझ्या घरावर व्यक्तिगत हल्ले करण्याऐवजी मोदी यांनी देशातील शेतकरी शेतमजूर कामगारांची चिंता करावी. माझ्या घराण्याची चिंता करणाऱ्या मोदी यांनी स्वतःच्या घराची चिंता करावी. पाच वर्षांचा कालखंड कसा गेला, काय विकास केला ते सांगावे. मोदी देशोदेशी फिरले मात्र, विकासाचे मॉडेल कुठेच उभे केले नाही, असा टोलाही त्यांनी मोदींना लगावला.
निवडणुकीच्या कामातून मोकळा झाल्यावर माझ्याकडे या आपण नारपारचा पाणी प्रश्न सोडवू, असे आश्वासन शरद पवार यांनी यावेळी दिले. त्यापूर्वी याविषयी माजी आमदार अनिल आहेर, आमदार पंकज भुजबळ यांनी नांदगावला पाणी मिळावे अशी मागणी केली होती. दिंडोरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले हे निवडणूक लढवत आहेत. त्यांना भाजपच्या डॉ. भारती पवार आणि मार्क्सवादी पक्षाचे जीवा पांडू गावीत यांचे आव्हान आहे. त्यामुळे दिंडोरीची निवडणूक तिरंग होण्याची शक्यता सांगितली जात आहे.