नाशिक - महापालिकेच्या महापौर, उपमहापौरपदासाठी आज निवडणूक झाली. महापालिकेत सत्ता टिकवण्याचे भाजपसमोर आव्हान होते. त्यासाठी गिरीश महाजन यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र, भाजपचे जेष्ठ नगरसेवक सतीश कुलकर्णी यांची बिनविरोध निवड झाली आहे.
सतीश कुलकर्णींची महापौरपदी निवड महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी 61 संख्याबळ आवश्यक होते. महापौर पदासाठी भाजपकडून सतीश कुलकर्णी उमेदवार होते. तर भिकुबाई बागूल उपमहापौर पदाच्या उमेदवार होत्या.
भाजपचे फुटीर 12 नगरसेवक भाजपच्या तंबूत परत
सतीश कुलकर्णी यांना उमेदवारी दिल्याने फुटीर नगरसेवक परत आले. त्यामुळे नाशिक महानगरपालिका महापौर निवडणुकीत भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सतीश कुलकर्णी यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे महापौर आमचाच होईल म्हणणाऱ्या शिवसेनेचा 'शो फ्लॉप' ठरला आहे.
शिवसेनेने गळाला लावलेला भाजपचा नाराज गट ऐनवेळी भाजपच्याच गटात सामील झाला. सेनेच्या चारही इच्छुकांसह काँग्रेसनेही माघार घेतल्याने भाजपचे कुलकर्णी यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर मनसेच्या 5 नगरसेवकांची वेळेवर भाजपला मदत केली आहे.