नाशिक- शहरात 4 मे रोजी मद्य विक्री सुरू केल्यानंतर तळीरामांनी दारु घेण्यास मोठी गर्दी होती. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. यानंतर आज जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर नाशकात टोकन पद्धतीने पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्यांच्या बंदोबस्तात दारू विक्री सुरू करण्यात आल्याने तळीरामांनी समाधान व्यक्त केले आहे.
नाशकात पोलीस बंदोबस्तात टोकन पद्धतीने दारू विक्री सुरू
दारु खरेदी करण्यासाठी तळीरामांनी दुकानांसमोर गर्दी केली होती. पण, सामाजिक अंतर ठेवत ऑनलाईन टोकनद्वारे विक्री करण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे.
आज टोकन पद्धतीने मद्य विक्रीची दुकाने सुरू करण्यात आहेत. पण, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन व्हावे यासाठी प्रत्येक मद्यविक्री दुकानाबाहेर पोलीस आणि राज्य उत्पादन विभागांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
काय आहेत नियम
- मद्य विक्री दुकाने इतर दुकाना प्रमाणे सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहतील.
- क्यूआर कोडमार्फत टोकन देऊन मद्य विक्री केली जाईल.
- ग्राहकांची थर्मल स्कॅनिंगद्वारे तपासणी करत सॅनिटाझरने हाथ धुतल्यानंतरच दारु खरेदी करता येणार.
- ग्राहकांना मास्क घालणे सक्तीचे
- दिवसाला एका दुकानातून 400 ग्राहकांना मद्य विक्री करता येणार
हेही वाचा -नाशकात कोरोनाचा आलेख वाढता, एका दिवसात ३८ कोरोनाबाधितांची भर