नाशिक -जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील मुल्हेर रोडवरील पेट्रोल पंपवर अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा घातला. त्यांनी तलवार आणि चॉपरचा धाक दाखवून रोकड लंपास केली.
मुल्हेर-ताहराबाद रोडवरील पेट्रोल पंपावर रविवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास हेल्मेट घालून २ दरोडेखोर कॅशिअरच्या कॅबिनमध्ये आले. त्यांनी कॅशिअरला तलवार आणि चॉपरचा धाक दाखवून ५० हजार रोकड लंपास केली. हेल्मेटमुळे त्यांचा चेहरा स्पष्टपणे दिसला नाही. मात्र, दरोडेखोर पंपावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने पोलीस त्यांचा शोध घेत आहे.