महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दिल्लीचे दरोडेखोर नाशिकमध्ये जेरबंद, चौकशीत 10 घरफोडींच्या घटनेची उकल

दरोडेखोरांच्या टोळीने घरफोडीत चोरलेले सोन्याचे दागिने सुरत येथे विक्री केले होते. पोलीस पथकाने सुरतमध्ये जावून 217 ग्रॅम वजनाचे सोन्याची लगड, 180 ग्रॅम वजनाची चांदीची लगड जप्त केली आहे.

nashik
दिल्लीचे दरोडेखोर नाशिकमध्ये जेरबंद, चौकशीत दहा घरफोड्यांची उकल

By

Published : Feb 8, 2020, 9:56 AM IST

नाशिक -शहरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दिल्ली आणि सुरत शहरांमधील दरोडेखोरांच्या टोळीतील चौघांना नाशिकच्या शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने जेरबंद केले आहे. या दरोडेखोरांकडे केलेल्या चौकशीत त्यांनी शहरात दिवसा केलेल्या दहा घरफोड्यांची कबुली दिली आहे. आरोपी दरोडेखोरांकडून 8 लाख 46 हजार 260 रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.

हेही वाचा -लासलगाव; कांदा निर्यातबंदी उठवण्यासाठी शेतकऱ्यांचे 'शोले' स्टाईल आंदोलन

याप्रकरणी पोलिसांनी रियासत अली मन्सूरी मोहम्मद, अरबाज रफीक अहमद शेख, मोहम्मद सरफराज शेख (राहणार उत्तर प्रदेश) आणि सिकंदरखान छोटुखान पठाण (राहणार गुजरात) यांना अटक केली आहे. आपरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी शहरात दरोडा टाकण्यासाठी आल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून गावठी रिव्हॉल्व्हर, दोन जिवंत काडतुसे, दरोडा टाकण्यासाठीचे इतर साहित्य जप्त केले आहे. आरोपींनी शहरातील मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार, इंदिरानगर हद्दित 3, सरकारवाडा उपनगर आणि गंगापूर हद्दीत प्रत्येकी एक घरफोडी केल्याची कबुली दिली आहे.

हेही वाचा -मालेगावात मुलांच्या भांडणातून राजकीय नेत्याचा पोलिसांसोबत वाद, पोलीस ठाण्यासमोर जमलेल्या जमावामुळे तणाव

या दरोडेखोरांच्या टोळीने घरफोडीत चोरलेले सोन्याचे दागिने सुरत येथे विक्री केले होते. पोलीस पथकाने सुरतमध्ये जावून 217 ग्रॅम वजनाचे सोन्याची लगड, 180 ग्रॅम वजनाची चांदीची लगड जप्त केली आहे. गुन्हे शाखा युनिट एकचे सहायक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, पोलीस नाईक विशाल काठे, पोलीस शिपाई स्वप्नील जुंद्रे, प्रवीण चव्हाण, विशाल देवरे यांनी गस्तीवर असताना या टोळीला जेरबंद केले. अंबड येथील यशवंत मार्केट जवळ संशयितांची टोळी पोलिसांना पाहून पळत असताना पोलिसांनी पाठलाग करून या पाच पैकी चौघा आरोपींना गजाआड केले. यातील सलमान शेख हा आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details