नाशिक - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉगडाऊन आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद आहेत. अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त नागरीकांना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच जिल्हाबंदी असल्याने बाहेरील जिल्ह्यातून तसेच राज्यातून शहरात येणारी वाहने कमी झाल्याने शहरातील सर्वच रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत आहे. याचा परिणाम रस्ते अपघातावर झाला असून शहरातील अपघाताच्या घटनांमध्ये तब्बल 90 टक्के घट झाली आहे.
कोरोना इफेक्ट: नाशिक शहराच्या अपघातात 90 टक्के घट - corona news
कोरोनामुळे राज्यात सर्वत्र लॉकडाऊन आहे. अत्यावश्यक सोडून सर्व सेवा बंद आहेत. लॉकडाऊनचा परिणाम रस्ते अपघातावर झाला आहे. नाशिक शहरातील अपघाताच्या घटनांमध्ये तब्बल 90 टक्के घट झाली आहे.
नाशिक शहराच्या अपघातात 90 टक्के घट
नाशिक शहरात महिन्याला सरासरी 150 ते 200 लहान मोठे अपघात होता होते. याची नोंद नाशिकच्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात होत असते. मात्र, सध्या लॉगडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता कुठलीचं वाहने रस्त्यावर दिसत नाहीत. तसेच जिल्हाबंदीची पोलीस कडक अंमलबजावणी करत असल्याने इतर जिल्ह्यातून आणि परराज्यातून वाहने शहरात येत नसल्याने देखील अपघाताच्या घटना थांबल्या आहेत.
Last Updated : Apr 11, 2020, 10:04 PM IST