महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दिंडोरी मतदारसंघ : लाँग मार्चमुळे गावितांची दावेदारी मजबूत, निवडणूक होणार तिरंगी

दिंडोरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व माकप या तिन्ही पक्षांच्या उमेदवारांनी पाणी व शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव देण्याचा प्रश्न प्रामुख्याने सोडवण्याचे आश्वासन दिले.

दिंडोरी मतदारसंघ

By

Published : Apr 16, 2019, 5:10 PM IST

नाशिक - दिंडोरी मतदारसंघात आदिवासी मतदार मोठ्या प्रमाणात असून हा मतदारसंघ पूर्वी मालेगाव मतदारसंघ म्हणून ओळखला जात होता. या मतदारसंघात पूर्वी काँग्रेस आणि जनता दलाचा बोलबाला राहिला आहे. परंतु, गेल्या ३ निवडणुकांपासून हा मतदारसंघ भाजपच्या हरिश्‍चंद्र चव्हाण यांच्या ताब्यात राहिला आहे. २००४ मध्ये या मतदारसंघातून मालेगावला वगळण्यात येऊन तो दिंडोरी मतदारसंघ म्हणून ओळखला जाऊ लागला.

दिंडोरी मतदारसंघ

दिंडोरी मतदारसंघ आदिवासीबहुल असल्याने येथील आदिवासींचा महत्त्वाचा सिंचन, व वन जमीन, शेतीला हमीभाव यांचा प्रश्न अद्याप सुटू शकला नाही. दिंडोरी मतदारसंघात मनमाड हे सर्वात मोठे शहर असून आतापर्यंत या परिसरात एकही मोठा प्रकल्प खासदार आणू शकले नाहीत. तसेच बेरोजगारीचा प्रश्न देखील सोडवू शकलेले नाही, त्यामुळे सध्या परिस्थितीला मतदारांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

माकपचे आमदार जीवा पांडू गावित यांनी आदिवासी प्रश्नांवर मागील वर्षी नाशिक ते मुंबई लाँग मार्च काढला होता. या जोरावर गावित हे खासदारकीची निवडणूक लढण्यास रिगंणात उतरले आहेत. त्यामुळे यंदाची निवडणूक तिंरगी होण्याची शक्यता आहे.

हरिश्चंद्र चव्हाण यांची ३ टर्ममधील कामगिरी फारशी उठावदार झाली नाही. भाजपने त्यांना डावलून राष्ट्रवादीच्या भारती पवार यांना उमेदवारी दिली. दिंडोरीचे शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली.

लोकसभा २०१४ निकाल
हरिश्चंद्र चव्हाण (भाजप ) ५ लाख ४२ हजार ७८४
डॉ.भारती पवार (राष्ट्रवादी ) २ लाख ९५ हजार १६५
हेमंत वाकचौरे (माकप) ७२ हजार ५९९

दिंडोरी मतदारसंघातील आत्तापर्यंतचे खासदार ( पूर्वीचा मालेगाव आणि दिंडोरी मतदारसंघ)
१९५७- १९६२ यादव नारायण जाधव( काँग्रेस)
१९६३- १९६७ एल. एल .जाधव (काँग्रेस)
१९६७ -१९७१ झेड. एम .कहांडोळे (काँग्रेस)
१९७१ -१९७७ झेड. एम. कहांडोळे (काँग्रेस )
१९७७ - १९८० हरिभाऊ महाले (जनता पक्ष )
१९८० - १९८४ झेड .एम .कहांडोळे (काँग्रेस )
१९८४ - १९८९ सिताराम सयाजी भोये (काँग्रेस)
१९८९ - १९९१ हरिभाऊ महाले (जनता दल )
१९९१ - १९९६ झेड.एम. कहांडोळे (काँग्रेस)
१९९६ - १९९८ कचरूभाऊ राऊत (भाजप )
१९९८ - १९९९ झेड. एम. कहांडोळे (काँग्रेस )
१९९९ - २००४ हरिभाऊ महाले (जनता दल)
२००४ - २०१९ हरिश्चंद्र चव्हाण (भाजपा )
२००९ - २०१४ हरिश्चंद्र चव्हाण (भाजपा)
२०१४- २०१९ हरिश्चंद्र चव्हाण (भाजप)

ABOUT THE AUTHOR

...view details