दिंडोरी (नाशिक) - येथिल ग्रामपंचायत येथे वणी व पंचक्रोशितील कोरोना रुग्नांच्या परिस्थितीबाबत आढावा बैठक सोमवार आज पार पडली. यावेळी झिरवाळांनी परिस्थीतीची संबधित आधिकाऱ्यांकडुन संपुर्ण माहिती घेत कोरोनाचा अटकाव करण्यासंदर्भात विचारविनिमय करत संबधितांना सुचना केल्या.
यावेळी वणीकरांच्या तर्फे वणीत ऑक्सिजन निर्मिती प्लँट तयार करता येईल का? जर हा प्लँट शक्य झाला तर वणी सह कळवण, सुरगाणा या तालुक्यांतील सरकारी व खासगी हॉस्पिटललाही पुरवठा करता येईल व त्यामुळे अत्यावश्यक वेळी नाशिक सिव्हीलवर येणारा भार हलका होईल, असे माजी उपसरपंच विलास कड व मनोज शर्मा यांनी आमदार झिरवाळांना सांगितले. तसेच वणीसाठी वणीतील आदीवासी मुला-मुलींचे हॉस्टेल स्वतंत्र विलिगीकरण कक्ष म्हणुन सुरु करण्याबात मागणी केली गेली. आमदार झिरवळांनी तात्काळ वरिष्टांशी पाठपुरावा करुन संबधीतांना कार्यवाही करायला सांगत पुढील दोन दिवसात सदरचे विलिगीकरन कक्ष कार्यन्वित करावे यासाठी सुचना दिल्या. वणी ग्रामिण रुग्नालयातील वैद्यकिय अधिकेषक डॉ. राजेंद्र बागुल व त्यांचे सहकारी अतिशय उत्कृष्टपणे कोरोना कक्षात त्यांची कामगिरी बजावत असुन त्यांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.