नाशिक - भारताच्या हवाई दलाने नियंत्रण रेषेजवळील दहशतवादी अड्ड्यांवर केलेल्या कारवाईचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. भारताने हा हल्ला दहशतवादाविरोधात केला असून पाकिस्तानने हा हल्ला आमच्यावर झाला असे म्हणत भारताला प्रत्युत्तर दिले, तर त्यासाठी भारतीय सेना सक्षम आहे. लढाईची वेळ आल्यास विजय भारताचाच होईल, अशी प्रतिक्रिया निवृत्त हवाई दल अधिकारी अनिल सिंघा यांनी नाशिकमध्ये ई-टीव्ही भारतच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.
'पाकिस्तानने हल्ला केला, तर उत्तर देण्यासाठी भारतीय जवान सक्षम' - पाकिस्तान
भारताच्या हवाई दलाने चांगली रणनीती आखून ही कारवाई केली असून यामुळे दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले आहे. यापुढे ते भारतीय सैन्यावर हल्ला करताना चारवेळा विचार करतील, असेही मत अनिल सिंघा यांनी व्यक्त केले.
भारताच्या हवाई दलाने चांगली रणनीती आखून ही कारवाई केली असून यामुळे दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले आहे. यापुढे ते भारतीय सैन्यावर हल्ला करताना चारवेळा विचार करतील, असेही मत अनिल सिंघा यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले, की याला अनेकजण पूलवामाचा बदला म्हणत असले, तरी दहशतवादी आमच्या जवानांना मारत असतील, तर ती सैन्याच्या गौरव आणि सन्मानाला धक्का लावणारी बाब आहे. त्यांचा हा सन्मान ठेवण्यासाठी दहशतवाद विरोधात ही कारवाई करण्यात आली आहे.
मोदी सरकारने पहिल्यादाच सैन्याला अशी खुली सूट दिली. तसेच आधीच्या सरकारने असे कधीच केले नव्हते, असाही दावा सिंघा यांनी यावेळी केला.