महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औषधांचा काळाबाजार रोखण्यासाठी मोठा निर्णय; शासकीय रुग्णालयात मिळणार 'रेमडिसिव्हर' - Remdesivir nashik news

नाशिक जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या नियोजन भवनात आढावा बैठक पार पडली. या बैठकीत सिन्नरमधील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणाबरोबरच तेथील कोरोनाबाधितांना सुविधा देण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आले.

Remdesivir
रेमडिसिव्हर

By

Published : Sep 25, 2020, 5:38 PM IST

नाशिक - सिन्नर तालुक्यासह जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्येच रेमडिसिव्हर आणि इतर कोरोना औषधे उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करण्यात आली.

छगन भुजबळ - पालकमंत्री, नाशिक

नाशिक जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या नियोजन भवनात आढावा बैठक झाली. या बैठकीत सिन्नरमधील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणाबरोबरच तेथील कोरोनाबाधितांना सुविधा देण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आले. याशिवाय जिल्ह्यात सुरू असलेल्या औषधांचा काळाबाजार रोखण्यासाठी रेमडिसिव्हर आणि इतर महागडी औषधं आता शासकीय रुग्णालयांमध्ये छापील दरात उपलब्ध करून देण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या. याबरोबरच जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा असल्याचा दावाही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या बैठकीत केला आहे..

हेही वाचा -'एसपीं'च्या निधनाने संगीतातील एका सुवर्ण युगाचा अंत

या बैठकीसाठी सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, मनपा आयुक्त कैलास जाधव, नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोडे यांच्यासह सिन्नर नगरपालिकेतील अधिकारी आणि सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी उपस्थित होते. कोरोना संकटात रेमडिसिव्हर इंजेक्शनच्या तुटवड्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता यापुढे जिल्हा रुग्णालयासह दोन महापालिका व दोन खासगी अशा एकूण पाच रुग्णालयांतच रेमडिसिव्हर इंजेक्शनचा साठा केला जाईल. रुग्णालयांना रोज इंजेक्शन साठ्यांची माहिती फलकावर द्यावी लागेल. तसेच या सर्व इंजेक्शनचा हिशोब ठेवण्यासाठी एका वरिष्ठ अधिकार्‍याची नेमणूक केली जाईल, अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

जिल्ह्यात ८८ टक्के कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या सात हजार इतकी आहे. जिल्ह्याचा मृत्यूदर १.६ टक्के असून, तो आणखी खाली आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. जिल्ह्यात ऑक्सिजनचा देखील पुरेसा साठा आहे. जिल्ह्याला २४२८ मेट्रिक टन ऑक्सिजन लागतो. आपल्याकडे ५५०० इतक्या मुबलक प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. कोरोनाची सर्व औषधे यापुढे जिल्हा प्रशासनच उपलब्ध करुन देईल, असेही त्यांनी सांगितले.

धनगर आरक्षणाबाबत त्यांना विचारले असता, धनगर आरक्षणाबाबत पक्ष जी भूमिका घेईल तीच माझी भुमिका असेल, असे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.

ABOUT THE AUTHOR

...view details