नाशिक- गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग थांबविण्यात आला आहे. तब्बल पंधरा दिवसांनी हा विसर्ग थांबविण्यात आला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने विश्रांती घेतल्याने विसर्ग पूर्णपणे थांबविण्यात आला आहे. गंगापूर धरणातील पाणीसाठा आता ९० टक्क्यांवर येऊन ठेपला आहे. यंदाच्या वर्षी झालेल्या पावसाची आकडेवारी पाहता वार्षिक सरासरीत १०५ टक्के पाऊस नाशिकमध्ये पडला आहे. इतिहासात पहिल्यांदाच रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद झाली आहे. नाशिकमधून आत्तापर्यंत ७३ टीएमसी पाणी जायकवाडीकडे विसर्ग करण्यात आले आहे.
नाशिकमध्ये यावर्षी रेकॉर्डब्रेक पाऊस; नांदूर-मधमेश्वर धरणातून 2 लाख 91 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग - नांदूर-मधमेश्वर धरणातून
गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग थांबविण्यात आला आहे. गंगापूर धरणातील पाणीसाठा आता ९० टक्क्यांवर येऊन ठेपला आहे. यंदाच्या वर्षी झालेल्या पावसाची आकडेवारी पाहता वार्षिक सरासरीत १०५ टक्के पाऊस नाशिकमध्ये पडला आहे. नाशिकमधून आत्तापर्यंत ७३ टीएमसी पाणी जायकवाडीकडे विसर्ग करण्यात आले आहे.
पावसामुळे दरवर्षी होणारा उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील वादही टळणार आहे. प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे नुकसानीची आकडेवारी देखील कमी आहे. विशेष बाब म्हणजे नाशिकमधील धरणात मराठावाड्याला जास्तीचे पाणी सोडूनही ८१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यंदाच्या मान्सून हंगामात नाशिकमध्ये पावसाने आजवरचे सगळे विक्रम मोडीत काढले आहेत. पहिल्यांदाच नांदूर-मधमेश्वर धरणातून 2 लाख 91 हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. तर नाशिकमध्ये झालेल्या पावसामुळे उत्तर महाराष्ट्राच्या पाण्याचा प्रश्न देखील मिटला असल्याचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सांगितले.
नाशिकमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला. नदीलगतच्या 22 हजार हेक्टर जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासकीय पातळीवर शेतजमिनीचे पंचनामे चालू आहेत. शेतकऱ्यांना तातडीने पहिल्या टप्प्यात सात हजार रुपये देण्यात येत आहेत. तसेच पुरामुळे गोदावरी नदी पात्रालगतच्या जवळपास तीन हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असल्याची माहिती मांढरे यांनी दिली. पुराच्या पाण्यामुळे दोन नागरिकांचा मृत्यू झाला. नागरिक पूर ओसरल्यामुळे आपआपल्या घरी जात असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.