महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

व्हायच होते शिक्षक, पण बनले पोलीस उपनिरीक्षक

अनेक वर्षांपासून शिक्षक भरती बंद आहे. त्यामुळे डी.एड. आणि बी.एड. झालेले अनेक जण शिक्षक होण्याचे आपले स्वप्न पूर्ण करू शकत नाहीत. पण, काही जण परिस्थितीला तोंड देत दुसरा मार्ग स्वीकारला. सोमवारी नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकॅडमीत पोलीस उपनिरीक्षकांचा दीक्षांत सोहळा संपन्न झाला. यामध्ये सर्वोत्कृष्ठ महिला आणि पुरूष प्रशिक्षणार्थी म्हणून डी.एड. आणि बी.एड.चे शिक्षण पूर्ण केलेले विजया पवार व संतोष कामटे यांना मान मिळाला.

By

Published : Dec 31, 2019, 7:22 PM IST

पोलीस उप निरीक्षक विजया पवार व संतोष कामटे
पोलीस उप निरीक्षक विजया पवार व संतोष कामटे

नाशिक- नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकॅडमीत सोमवारी (दि. 29 डिसें.) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात दीक्षांत सोहळा संपन्न झाला. 117 व्या तुकडीत 689 जण पोलीस उपनिरीक्षक म्हणून पोलीस दलात दाखल झाले. मात्र, यातील अनेकांनी बी.एड., डी.एड. शिक्षण पूर्ण करून शिक्षक होण्याची स्वप्न बघितली होती. मात्र, मागील 10 वर्षांपासून शिक्षक भरती न झाल्याने अनेकांनी देशसेवेचे व्रत अंगी करून पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न बघितले आणि पूर्ण देखील केले.

प्रतिक्रिया देताना पोलीस उपनिरीक्षक संतोष कामटे व विजया पवार

पोलीस उपनिरीक्षक प्रशिक्षणार्थींमध्ये सर्वोत्कृष्ट समजली जाणारी मानाची तलवार स्वीकारणारे संतोष कामटे यांनी 'ईटीव्ही भारत'ला प्रतिक्रिया देताना म्हटले, घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती, अशा परिस्थितीतही आई-वडिलांनी मला मोलाची मदत केली. मी हे श्रेय त्यांना देतो. मी पोलीस उपनिरीक्षक होण्याची पूर्व परीक्षा काठावर पास झालो. मुख्य परीक्षेसाठी कुठलीच अकॅडमी किंवा ग्रंथालय लावली नाही. घरीच अभ्यास केला, यात मला माझ्या मित्रांनी मोठी मदत केली. 2011 मध्ये डी. एड.ची परीक्षा पास झालो. मात्र, मागील 10 वर्षांपासून शिक्षक भरती नसल्याने मी 2016 ला पोलीस उपनिरीक्षक पदाची जाहिरात बघितली आणि परीक्षा दिली. प्रामाणिकपणे अभ्यास केला. या पुढे देखील कर्तव्य पार पाडत प्रमाणिकपणे प्रयत्न करून पुढच्या पायरीवर जाणार असल्याचे मत पोलीस उपनिरीक्षक संतोष कामटे यांनी व्यक्त केले.

हेही वाचा - 'कष्टाने कमावलेल्या वर्दीला डाग लागू देऊ नका'

या प्रशिक्षणामध्ये अहिल्याबाई होळकर उत्कृष्ट महिला प्रशिक्षणार्थी आणि बेस्ट ट्रेनीचा बहुमान मिळवलेल्या विजया पवार यांनी 'ईटीव्ही भारत'शी प्रतिक्रिया देताना म्हणाल्या, 14 महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून पोलीस उपनिरीक्षक होण्याचा खून आनंद होत आहे. माझ्या कुटुंबाच्या डोळ्यात मला चमक दिसत आहे. मी शिक्षक होण्यासाठी डी.एड.चे शिक्षण पूर्ण केले. मात्र, शिक्षक भरती नसल्याने पोलीस खात्याकडे वळले. कोणतेही काम करायचे ते व्यवस्थित करायचे, असे मला वाटते. एम.पी.एस.सी.ची अभ्यास करण्यातसाठी मोठा त्याग करावा लागतो. मी अभ्यासाच्या काळात सोशल मीडियापासून दूर होते. पतीने पाठिंबा दिला. आईने माझ्या 2 मुलांना 2 वर्षे सांभाळले म्हणून मी आज पोलीस उपनिरीक्षक होऊ शकले. महिला अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. मात्र, महिलांना स्व-रक्षण करता येईल इतपत त्यांनी सक्षम व्हावे. महिला या अबला असतात विचार करतात म्हणून काही पुरुष त्याचा फायदा घेतात. महिलांना स्वतःचे स्व-रक्षण करता आले पाहिजे त्यांनी कोणावर अवलंबून राहायला नको. मी देखील पोलीस खात्यात तत्परतेने काम करेल. खास महिलांच्या स्वरक्षणासाठी प्रयत्न करेल, असे मत पोलीस उपनिरीक्षक विजया पवार यांनी व्यक्त केले.

हेही वाचा - नाशिक : वणी येथील के आर टी हायस्कूलच्या क्रीडा शिक्षकावर हल्ला

ABOUT THE AUTHOR

...view details