नाशिक -युती करून मनसेशी आणि भाजपचा काहीही फायदा होणार नाही. राज ठाकरे यांनी फक्त झेंड्याचा रंग बदलून चालणार नाही. त्यांना मनही बदलावे लागेल. त्यांनी भाजपसोबत येऊ नये. त्यांना आमचा विरोध आहे, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले. सामाजिक न्याय व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नाशिक विभागातील मागील पाच वर्षांच्या विविध योजनांच्या सद्यस्थितीबाबत त्यांनी आढावा घेतला. आठवलेंच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे बैठक पार पडली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
राज ठाकरेंनी झेंड्याचा रंगच नाही तर, मनही बदलावे - रामदास आठवले - राज ठाकरेंना रामदास आठवलेंंचा विरोध
मनसेने त्यांच्या मनसे अधिकृत या ट्विटर हँडलवरून मनसेचा झेंडा काढून फक्त इंजिनाचे चिन्ह ठेवले आहे. त्यामुळे मनसे भाजपसोबत जाणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. त्यातच आता भाजपचा मित्रपक्ष असलेल्या रिपाईचे रामदास आठवले यांनी राज ठाकरेंनी भाजपमध्ये येऊ नये. ते आले तरी भाजपने त्यांना सोबत घेऊ नये, असे वक्तव्य केले आहे.
मनसेचे उद्या २३ जानेवारीला अधिवेशन होणार आहे. त्यातच मनसेने त्यांच्या मनसे अधिकृत या ट्विटर हँडलवरून मनसेचा झेंडा काढून फक्त इंजिनाचे चिन्ह ठेवले आहे. त्यामुळे मनसे भाजपसोबत जाणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या अधिवेशनात मनसे प्रमुख राज ठाकरे मोठी घोषणा करणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच आता भाजपचा मित्रपक्ष असलेल्या रिपाईचे रामदास आठवले यांनी राज ठाकरेंनी भाजपमध्ये येऊ नये. ते आले तरी भाजपने त्यांना सोबत घेऊ नये, असे वक्तव्य केले. त्यामुळे राज ठाकरे भाजपमध्ये गेल्यास आठवले काय भूमिका घेणार, हेदेखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हे वाचलं का? - 'नाईट लाईफमुळे महिला-मुलींची सुरक्षितता धोक्यात येईल, आमचा विरोध'