नाशिक - आरती सिंह यांनी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारताच अवैध धंद्यावर धाडसत्र सुरू केले आहे. पोलिसांनी गेल्या २ दिवसात सुरगाणा तालुक्याच्या बोरगाव आणि उंबरठाण परिसरात अवैधरित्या सुरू असलेल्या १३ ठिकाणी गावठी दारूभट्टी तसेच जुगार अड्ड्यावर छापा टाकला आहे.
पदभार स्वीकारताच नाशिकच्या पोलीस अधीक्षकांचे धाडसत्र; सुरगाणा तालुक्यात अवैध धंद्यांवर छापे - police
या कारवाईत ६ जणांना ताब्यात घेतले असून जवळपास अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारी २ हजार लीटर रसायने नष्ट करण्यात आली. या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. उंबरठाण येथील जुगाराच्या अड्ड्यावर कारवाई करून ६ गाड्यांसह १ लाख ७५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या कारवाईत ६ जणांना ताब्यात घेतले असून जवळपास अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारी २ हजार लीटर रसायने नष्ट करण्यात आली. या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. उंबरठाण येथील जुगाराच्या अड्ड्यावर कारवाई करून ६ गाड्यांसह १ लाख ७५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याचप्रमाणे बोरगाव परिसरात नदीपात्रात वेगवेगळ्या ठिकाणी अवैध दारू काढली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रविवारी बोरगावपासून चिखलीपर्यंतच्या संपूर्ण नदीपात्राची पायी गस्त करून पाहणी केली.
याठिकाणी २ हजार लिटरपर्यंत दारू तयार करण्यासाठीचे कच्चे रसायन व त्यासाठी लागणारे साहित्य नष्ट करण्यात आले. या गावठी दारूची अंदाजे किंमत ७० हजार रुपये आहे. गावठी दारू जप्त करून ती नष्ट करण्यात आली. यावेळी पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक दिनेश भदाणे यांनी सुरगाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे चालणार नसल्याचा इशारा दिला आहे.