नाशिकRaid On Drug Factory: राज्यात ड्रग्जचे रॅकेट उध्वस्त करण्यासाठी मुंबई पोलिसांसह पुणे पोलीस, नाशिक पोलीस कसून तपास करत आहेत. मुंबई पोलिसांनी नाशिक येथील कारखाना उध्वस्त केल्यानंतर नाशिक पोलिसांनी सुद्धा शहरातील नाशिकरोड भागातील सामनगाव परिसरात एमडी प्रकरण (raw material of MD drugs seized) उघडकीस आणले होते. याच प्रकरणातील धागेदोऱ्यांच्या आधारे अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीतून सोलपूरमधून नाशिकला ड्रग्ज पुरवठा होत (MD Drug Seized) असल्याचे समोर आले. यानंतर नाशिक पोलिसांनी आठ दिवसांपूर्वी सोलापूरमध्ये जात ड्रग्जचा कारखाना उध्वस्त करत 10 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. याच कारखान्याच्या शेजारील भागात असलेले एमडी बनविण्यासाठी लागणारे लाखो रुपयांची रसायने व साहित्य शाेधून काढत उद्धवस्त केले आहेत. (Nashik crime)
गोदामात आढळला ड्रग्ज निर्मितीचा कच्चा माल :नाशिक पोलिसांनी काही दिवसांपूर्वी सामनगाव एमडी प्रकरणातील संशयित आरोपी सनी पगारे याने सोलापुरात सुरू केलेला एमडीचा कारखाना नाशिक अंमली पदार्थ विरोधी पथक आणि गुन्हे शोध युनिट एकच्या पथकाने 27 ऑक्टोबर रोजी उद्ध्वस्त केला. तिथून दहा कोटी रुपयांच्या एमडीसह कोट्यवधी रुपयांचा कच्चा माल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणात नाशिकचा मनोहर काळे या संशयिताला पोलिसांनी 28 ऑक्टोबर रोजी अटक केली. त्याने सनीच्या सांगण्यावरून कारखाना जागा मालक अंकुश चौधरी यांच्या सोबत वीस हजार रुपये प्रतिमहा नफ्याकरिता कारखान्याचा भाडेकरार केला होता. तर काळे याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी वैद्यनाथ वावळ याला अटक करण्यात आली. वावळने दिलेल्या माहितीनुसार कारखान्यासाठी लागणारा कोट्यवधी रुपयांचा कच्चा माल एका गोदामात होता. ही माहिती मिळताच गुन्हे शाखेने सोलापुरात दाखल होत गोदामात धाड टाकून लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.