नाशिक - महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ युतीच्या मेळावा पार पडला. यावेळी गिरीश महाजन यांनी राहुल गांधींनी मोदींविषयी केलेल्या वक्तव्यावर राहुल गांधींची खिल्ली उडवली. राहुल गांधींनी पुण्यात हजारो तरुण - तरुणींना जमवले आणि भाषण करताना म्हणाले आय लव मोदी. हे म्हटल्यावर उपस्थित तरुण - तरुणींनी देखील मोदींचा जयघोष केला. त्यामुळे राहुल गांधींना कुठे काय बोलावे हे देखील कळत नाही, असे महाजन म्हणाले.
राहुल गांधींना कुठे काय बोलावे कळत नाही - गिरीश महाजन - mahajan
काँग्रेसच्या नेत्यांनाही स्वप्नात वाटणार नाही असे विधान राहुल गांधी करत आहेत. राहुल गांधींच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. इतके बालिश विधाने ते करत आहेत. त्यांच्या ह्या बालिशपणामुळे देशात काँग्रेस शंभरी गाठणार नाही, असे महाजन म्हणाले.
काँग्रेसच्या नेत्यांनाही स्वप्नात वाटणार नाही असे विधान राहुल गांधी करत आहेत. राहुल गांधींच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. इतके बालिश विधाने ते करत आहेत. त्यांच्या ह्या बालिशपणामुळे देशात काँग्रेस शंभरी गाठणार नाही, असे महाजन म्हणाले. ते पुढे म्हणाले, की मोदींना पंतप्रधान करण्याच्या हेतूनेच भाजप सेनेची युती झाली आहे. राज्यात भाजप - सेनेची महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद सर्वाधिक सदस्य संख्या आहे, त्यामुळे नाशिकच्या लोकसभेत युतीचा उमेदवार बहुमतांनी विजयी होणार आहे.
सर्वांनी यासाठी जोमाने कामाला लागले पाहिजे. एका कार्यकर्त्याकडून ५० ते ६० लोकांना मतदानाला आणण्याची जबाबदारी आहे. हे जर आपण अचूकपणे केले तर महाराष्ट्रात चमत्कार घडेल. मागच्या पेक्षा अधिक उमेदवार निवडून येतील. राज्यातील अनेक नेत्यांची भाजपमध्ये येण्यासाठी रिघ लागली आहे असे गिरीश महाजन यांनी सांगितले.