महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बाजारात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर प्रियांका गांधी पडल्या भारी

नाशिकच्या बाजारात प्रियंका गांधी आणि नरेंद्र मोदींच्या प्रतिमा असलेल्या पिचकाऱ्या सर्वाचे लक्ष वेधून घेत आहेत. या पिचकऱ्यांची मागणी देखील वाढली आहे.

बाजारात प्रियंका गांधी आणि नरेंद्र मोदींच्या प्रतिमा असलेल्या पिचकाऱ्या सर्वाचे लक्ष वेधून घेत आहेत.

By

Published : Mar 19, 2019, 2:47 PM IST

नाशिक- रंगपंचमी २ दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशातच रंग खेळण्यासाठी विविध पिचकाऱ्या आणि रंगांनी बाजार सजला आहे. मात्र, यंदाच्या रंगपंचमीवर लोकसभा निवडणुकीचा प्रभाव पाहायला मिळत आहे. बाजारात प्रियंका गांधी आणि नरेंद्र मोदींच्या प्रतिमा असलेल्या पिचकाऱ्या सर्वाचे लक्ष वेधून घेत आहेत. या पिचकऱ्यांची मागणी देखील वाढली आहे.

बाजारात प्रियंका गांधी आणि नरेंद्र मोदींच्या प्रतिमा असलेल्या पिचकाऱ्या सर्वाचे लक्ष वेधून घेत आहेत.

नाशिक येथील एका दुकानात 'प्रियंका वॉटक टँक' असे लिहिलेली पिचकारी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा असलेल्या पिचकाऱ्यांची पहिल्याच दिवशी विक्री झाल्याचे दुकानदाराने सांगितले. यावरून या रंगपंचमीवर लोकसभा निवडणुकांचा प्रभाव दिसून येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details