येवला - तालुक्यातील उत्तर भागात दुपारच्या सुमारास मान्सूनपुर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. यामध्ये नागरिकांसह शेतातील उघड्यावर असणारा शेतमाल झाकण्यासाठी शेतकऱ्यांचीही चांगलीच तारांबळ उडाली.
उत्तर भागातील गावांना झोडपले

हा पाऊस वादळी-वारा आणि मेघगर्जनेसह पडला. यामध्ये विखरणी, विसापूर, पाटोदा, मुरमी या गावांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. तसेच, शेतात काढून ठेवलेला कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांचीही चांगलीच धावपळ झाली. बऱ्याच शेतकऱ्यांचा उघडयावर असलेला कांदा भिजल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा -पुण्यातील विकेंड लॉकडाऊन रद्द; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची घोषणा