महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

येवल्यात खत टंचाईमुळे प्रहार संघटनेचा उपोषणाचा इशारा.... - येवल्यात खत टंचाई

येवला तालुक्यात युरिया खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून खतांची जास्त दराने विक्री होत असल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे खतांचा तुटवडा दूर करून सुरळीत खतविक्री करावी अन्यथा, उपोषण करण्याचा इशारा प्रहार संघटनेचे हरीभाऊ महाजन यांनी दिला आहे. त्यांनी याबाबत प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

Prahar sanghatana Strike warning Due to fertilizer shortage in yeola
येवल्यात खत टंचाईमुळे प्रहार संघटनेचा उपोषणाचा इशारा....

By

Published : Jul 29, 2020, 7:16 PM IST

येवला (नाशिक ) - येवला तालुक्यात युरिया खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून खतांची जास्त दराने विक्री होत असल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे खतांचा तुटवडा दूर करून सुरळीत खतविक्री करावी अन्यथा, उपोषण करण्याचा इशारा प्रहार संघटनेचे हरीभाऊ महाजन यांनी दिला आहे. त्यांनी याबाबत प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

चालू हंगामात भरपूर पुरेशा प्रमाणात वेळेवर पाऊस झाल्याने येवला तालुक्यातील पिके चांगल्या प्रकारे असून पिकांची वाढ पुरेश्या प्रमाणात होत आहे. या काळात पिकांना खतांची अतिशय गरज असते. याच परिस्थितीचा गैरफायदा घेत खत विक्रेते कृत्रिम टंचाई निर्माण करून चढ्या दराने युरिया व खताबरोबर इतर खते घेणे सक्तीचे करत आहे. ही बाब शेतकऱ्यांसाठी अत्यंत अडचणीची ठरत असून, या युरिया खताच्या टंचाईकडे लक्ष द्यावे व वितरणावर सुधारणा करावी अशा आशयाचे निवेदन प्रहार संघटनेच्यावतीने प्रांत अधिकारी सोपान कासार यांना देण्यात आले.

शेतकऱ्यांना वेळेवर खत उपलब्ध होत नसल्याची परिस्थिती येवला तालुक्यात निर्माण झाली असून, मुबलक प्रमाणात खत केव्हा उपलब्ध होईल अशा चिंतेत बळीराजा सापडला आहे. या सर्व घडामोडीत ज्यादा दराने खताची विक्री करण्याचे प्रकार आहे घडत आहेत. बांधावर बी-बियाणे व खते पुरवणारी शासकीय यंत्रणा तालुक्यात जोमाने कार्यरत असल्याचा दावा कृषी विभागाकडून करण्यात येत असला तरी प्रत्यक्षात शेतकरीवर्गस खते मिळत नाहीत. याकडे प्रहार संघटनेने लक्ष वेधले असून, रासायनिक खतांचा काळाबाजार थांबवा, मुख्य विक्रेत्यांच्या गोदामाची तपासणी करावी, तसेच बनावट खते जप्त करून योग्य कारवाई करावी अशा मागण्यांसाठी प्रहार संघटनेच्यावतीने प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. मागण्या मान्य न झाल्यास प्रहार संघटनेने उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details