नाशिक - दृष्टीस न पडणाऱ्या कोरोना विषाणुशी लढताना आरोग्य सेवकांसाठी पीपीई कीट सुरक्षा कवच ठरत आहे. नाशिक जिल्ह्यात सध्या वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये 600 पीपीई किट्सचा रोज वावर होत असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. मुंबई, पुण्यापाठोपाठ नाशिक जिल्ह्यातदेखील कोरोनाबधितांचा आकडा वाढत असून नाशिकच्या मालेगावात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठी आहे.
कोव्हिड युद्धात आरोग्य सेवकांसाठी पीपीई कीट ठरतीये सुरक्षा कवच मालेगावात 661 वर पोहोचली असून नाशिक जिल्ह्यात कोरोनाबधितांचा आकडा 851 असून यात 42 जणांचा मृत्यू झाला असून दिलासादायक बाब म्हणजे 601 जण हे कोरोना मुक्तदेखील झाले आहे. मात्र, कोरोनामुक्त होणाऱ्या जणांची संख्या मोठी असल्याने त्यांच्या मागे डॉक्टर नर्स आणि आरोग्य कर्मचारी यांचे मोठे योगदान आहे. मात्र, आरोग्य कर्मचारी आपले कर्तव्य बजावत असताना त्याच्या सुरक्षेची काळजीदेखील प्रशासन घेत आहे. कोरोना कक्षात काम करणाऱ्या डॉक्टर परिचारिका आणि वॉर्डबॉय हे पीपीई किट्सचा वापर करून कोरोनाबाधित रुग्णांना सेवा देत आहेत.
नाशिक शहरात जिल्हा शासकीय रुग्णालय, डॉ. झाकिर हुसेन हॉस्पिटल, डॉ. वसंत पवार मेडिकल हॉस्पिटल तसेच मालेगावात ग्रामीण रुग्णालय, मालेगाव महानगरपालिका रुग्णालय तसेच प्रत्येक तालुक्यात 1 ते 2 कोरोना कक्ष उभारण्यात आले आहेत. ह्या ठिकाणी कोरोना संशयित रुग्ण आणि कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. ह्या हॉस्पिटलमध्ये तीन शिफ्टमध्ये डॉक्टर परिचारिका काम करत असून आठ तासांच्या ड्युटीमध्ये प्रत्येक जण एक पीपीई किट्सचा वापर करत असून साधारण एका हॉस्पिटलमध्ये 30 पीपीई किट्सचा वापर केला जात असल्याचे सिव्हिल सर्जन डॉ. सुरेश जगदाळे यांनी सांगितले आहे.
वापरलेल्या पीपीई किट्सच्या विल्हेवाटाबाबत विशेष काळजी -
कोरोना कक्षात आरोग्य कर्मचाऱ्यांनी आठ तास वापरलेले पीपीई ह्यांची काळजीपूर्वक व्हिलेवाट लावली जाते. सुरुवातीला वापरुन झालेले पीपीई किट्स दोन बॅगमध्ये त्याची पॅकींग केली जाते. नंतर त्यांचे निर्जंतुकीकरण केले जाते. बायोमेडिकल वेस्टज डिस्पोजल करण्यासाठी वॉटर रेंज ह्या कंपनीला शासनाने काम दिले आहेत. त्यांचे कर्मचारी ह्या बॅग घेऊन जात बायोमेडिकल वेस्टेजसोबत त्याची शासनाने दिलेल्या नियमानुसार सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही अशा प्रकारे पीपीए किट्स नष्ट केले जातात. कापड आणि प्लास्टिकचा वावर करून पीपीई किट्स तयार केले जातात. ह्यात संपूर्ण गाऊन, हॅन्ड ग्लोज, कॅप, मास्क, शू कव्हरचा समावेश असतो.