महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nashik News: तर, 1 नोव्हेंबरपासून टोल बंद करणार छगन भुजबळांचा कडक इशारा - Nashik News

Nashik News: ऑक्टोबरपर्यंत नाशिक- मुंबई राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा झाली नाही, तर 1 नोव्हेंबरपासून टोल बंद करण्याचा इशारा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे. नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांना देत लोकांच्या संयमाचा अंत पाहू नका, असा सज्जड दम त्यांनी दिला. Nashik News छगन भुजबळ यांनी आज नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांसमवेत नाशिक ते वडपे दरम्यान मुंबई महामार्गावरील रस्त्याची पाहणी करत अधिकाऱ्यांची कानउघडनी करत फैलावर घेतले आहे.

Nashik News
Nashik News

By

Published : Oct 19, 2022, 7:24 PM IST

नाशिक ऑक्टोबरपर्यंत नाशिक- मुंबई राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा झाली नाही, तर 1 नोव्हेंबरपासून टोल बंद करण्याचा इशारा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे. नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांना देत लोकांच्या संयमाचा अंत पाहू नका, असा सज्जड दम त्यांनी दिला. Nashik News छगन भुजबळ यांनी आज नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांसमवेत नाशिक ते वडपे दरम्यान मुंबई महामार्गावरील रस्त्याची पाहणी करत अधिकाऱ्यांची कानउघडनी करत फैलावर घेतले आहे.

छगन भुजबळांचा इशारा

टोल बंद करण्याचा इशारा मुंबई आग्रा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने अनेकांना अपघातात आपला प्राण गमवावा लागला. याबाबत छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच नॅशनल हायवे यांना याबाबत पत्र व्यवहार केला आहे. मात्र अद्यापही रस्त्यावर प्रचंड प्रमाणात खड्डे असल्याने आज छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेत त्यांनी नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांसमवेत नाशिक ते इगतपुरी दरम्यान रस्त्याची पाहणी केली आहे. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना 31 ऑक्टोबरपर्यंत रस्त्यांवरील खड्डे न बुजविल्यास 1 नोव्हेंबरपासून टोल बंद करण्याचा इशारा दिला आहे.

यावेळी नॅशनल हायवेचे प्रकल्प अधिकारी साळुंखे, गोंदे ते पडघा टोलवेज पीक इंफ्रा कंपनीचे संचालक आनंद सिंग, माजी आमदार शिवराम झोले, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details